केंद्र सरकार लसी देत नाही असं बोललोच नाही, राजेश टोपेंचं स्पष्टीकरण; शाळांबाबत महत्वाचे संकेत

 


जालना : आजचा दिवस महत्वाचा आहे आज कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला (Corona Vaccine)1 वर्ष पूर्ण झाले आहे.राज्यात आपण 90 टक्के लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. दोन डोस 62 टक्के लोकांना लस दिले आहे. आणखी  आपल्याला काम करायचं आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले. 15 ते 18 वयोगटातील 42 टक्के लसीकरण केले आहे. स्कुल कॉलेज बंद असल्यामुळे आता घरोघरी जावून लसीकरण करणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. लसीकरणाचे महत्व खूप मोठे आहे,लसीकरणमुळे हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी आहे असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील कोरोनाबाधितांपैकी (Corona Patient) 86 ते 87 टक्के लोक होम क्वारटाईन आहेत. त्यामुळे लसीकरण करणे महत्वाचं आहे. शाळेच्या बाबतीत मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. मुलांचे बाधीत होण्याच प्रमाण कमी आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात पालकांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. मात्र पंधरा दिवसात शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या