पारनेर : - लाखो भाविकांचे कुलदैवत श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या राज्यस्तरीय "ब"वर्ग तीर्थक्षेत्रावर पौष पौर्णिमा यात्रेचा मंगळवार दि.१८ जानेवारी दिवसालाही भाविक भक्त यात्रेकरूंचा पूर्ण शुकशकाट पहावयास मिळाला. दरवर्षी यात्रेला लाखोंच्या गर्दीने फुलून जाणार कोरठण गडावर आज दिवसभर खंडोबा भक्ताविना मोकळा मोकळा वाटत होता.
सकाळी ७ वा. श्री खंडोबा अभिषेक पूजा महाआरती विस्वत किसन धुमाळ,पत्नी धुमाळ व सुदाम पुंडे,पत्नी यमुना पुंडे यांच्या हस्ते करण्यात आली.
सावरगाव घुले येथून आलेल्या मानाच्या पालखीच्या देवदर्शन पार पडला. सायंकाळी ७ वा. महाआरती अहमदनगर येथील ए पी आय शंकरसिंग रजपूत व गीता रजपूत यांच्या हस्ते झाली.
यात्रेच्या दुसऱ्या दिवसाला पोलिसांचा बंदोबस्त पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गद्शनाखाली वाढविण्यात आला. गारखिंडीघाट पायथा, नांदूरफाटा , अक्कलवाडी फाटा या तीन चेकपोस्टवर प्रत्येकी एक पोलीस अधिकारी आणि सहा पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त वाढ करण्यात आला आहे. यात्रेच्या परिसरात एकही दुकान लागलेले नाही. महिला पोलीस प्रियांका आठरे, पोलीस विभागाचे एपीआय जनोरकर, सुखदेव दुर्गे, ए एस आय सुनील कुटे, ए एस आय पठाणया अधिकाऱ्यांचा नियंत्रणात पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला. यात्रा नियोजना मध्ये जय मल्हार विद्यालयाचे शिक्षक कर्मचारी, ग्रामपंचायत पिंपळगाव रोठा यांचा सहभाग देवस्थानला मिळत आहे.
0 टिप्पण्या