स्विफ्टची मोटरसायकलला धडक एकाचा मृत्यू

श्रीगोंदा प्रतिनिधी : आढळगाव येथील रहिवासी असलेले मच्छिंद्र भगवान काळे वय वर्षे ४० यांचा काल दुपारी ३:०० च्या सुमारास स्विफ्ट गाडीने मोटरसायकलला धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला आ


हे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की श्रीगोंदा काष्टी रोडवरील न्यू लोकसेवा हॉटेल समोर स्विफ्ट क्रमांक MH:४२, BB ३१९८ या गाडीच्या चालकाने हयगईने गाडी चालवून समोरून मोटरसायकलवर येणार्‍या मच्छिंद्र काळे यांच्या मोटर सायकल क्रमांक MH:१६ BP ५९३७ ला जोराची धडक दिल्याने, अपघात झाला.

या अपघातात मच्छिंद्र काळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत संजय मोहन काळे, आढळगाव यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खबर दिली.यानंतर स्विफ्टच्या अज्ञात चालकावर श्रीगोंदा पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील गुन्हा पोलीस हवालदार झुंजार बाप्पू यांनी दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भैलुमे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या