पैशाच्या वादातून पती पत्नीस मारहाण

निरगुडसर जारकरवाडी :  ता. आंबेगाव येथे चुलत्याकडून हात उसने घेतलेल्या पैशाच्या वादातून पती पत्नीला मारहाण करण्यात आली असून याबाबत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद किरण राजेंद्र भोजने ( रा.जारकरवाडी ता.आंबेगाव पुणे ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी किरण भोजने यांनी चुलते कोंडीबा दिगंबर भोजने यांच्याकडून हात उसने पैसे घेतले होते त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. दि.१८ रोजी पैसे परत करायचे म्हणून फिर्यादी पैशाची जमवाजमव करत होते. ते गावात पैशाची जमवाजमव करत असताना फिर्यादी की पत्नी हिने फिर्यादिस फोन करून सांगितले की तुमचा चुलत भाऊ गौरव कोंडीबा भोजने व त्याची पत्नी सुवर्णा गौरव भोजने हे दोघेजण घरासमोर येऊन शिवीगाळ करत आहे. त्यावेळी फिर्यादी हा घरी गेला असता त्याने मी तुमचे पैसे देणार आहे तुम्ही शिव्या का देत असे विचारले असता सुवर्णा गौरव भोजने यांनी धक्का देऊन जमिनीवर पाडले.व चुलती हिराबाई कोंडीबा भोजने हिने हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादीचा चुलत भाऊ गौरव याने फिर्यादिस धक्काबुक्की करत मारहाण केली तसेच चुलते कोंडीबा भोजने यांनी लाकडी काठीने पाठीवर व पायावर मारहाण केली असल्याचे फिर्यादीत सांगितले आहे. भांडणाचा आरडाओरडा ऐकून भावकितील लोक जमा होऊन त्यांनी भांडने सोडवली त्यानंतर किरण भोजने यांनी याबाबत पोलिस ठाण्यात कोंडीबा दिगंबर भोजने, हिराबाई कोंडीबा भोजने, गौरव कोंडीबा भोजने, ( सर्व रा.जारकरवाडी ता.आंबेगाव पुणे ) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.पुढील तपास पो.हवा.हगवणे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या