शिर्सुफळ येथील शिरसाई मंदिरात चोरी; लाखोंचे साहित्य लंपास



बारामती :
 बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील शिरसाई देवीच्या मंदिरात शनिवारी मध्यरात्री  मोठी चोरी झाली असल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या घटनेने ग्रामस्थांत मोठी अस्वस्थता पसरली आहे. मंदिराच्या गेटचे कुलुप तोडून चोरट्यांनी मंदिरातील देवीच्या सोन्या-चांदिच्या दागिन्यांसह  पितळी सिंह, पितळी समया, स्पिकर मशीन, पंचारती धुपआरती व इतर साहित्य असा जवळपास तीन लाखांपर्यंत ऐवज चोरीला गेला आहे.

(दि:८) रोजी पहाटे शिरसाई मंदिरात काकड आरती चालू असल्याने पहाटे साडेचार वाजता मंदिरातील पुजारी व गावकरी मंदिरात गेले असता त्यावेळी चोरी झाल्याचे समजले. बारामती येथील पोलिसांनी पंचनामा करुन मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु केले आहे. यात एक महिला व दोन पुरुष असल्याचे माहिती मंदिरातील पुजारी संजय गुरव, सरपंच आप्पासाहेब आटोळे व ग्रामस्थांनी दिली.

बारामती तालुक्यातील जागृत देवस्थान आसलेले शिर्सुफळ येथील शिरसाई मंदिरात चोरी झाल्याच्या घटनेने  ग्रामस्थांत मोठी अस्वस्थता पसरली आहे. लवकरात लवकर सदर चोरटे पकडावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Attachments area

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या