नुसतं स्टेडियम उभारुन चालणार नाही, फुटबॉल वर्ल्डकपमध्ये भारताचा दरारा निर्माण व्हावा: उद्धव ठाकरे

 


नवी मुंबई : येथील फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व्हर्च्युअल पद्धतीने या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, एकाच ठिकाणी सर्व खेळांसाठीचं व्यासपीठ तयार झालं आहे, याचा खूप आनंद आहे. अशी व्यवस्था असणारं कदाचित महाराष्ट्र देशातील पहिलंच राज्य असावं.


उद्धव ठाकरे म्हणाले की, मला फुटबॉलचं फार ज्ञान नाही, मात्र आदित्यला (आदित्य ठाकरे) फुटबॉल खेळायला आवडतं, तेजस (ठाकरे) तर मोठ्या स्तरावर फुटबॉल खेळला आहे. या दोघांमुळे अनेकदा फुटबॉलचे सामने पाहायला मिळाले आहेत. अनेकदा सामने पाहायला जाणं व्हायचं. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, फुटबॉल हा केवळ पायाने खेळायचा खेळ नव्हे, यात देखील बुद्धीचा खूप वापर करावा लागतो. जितका बुद्धीबळ खेळताना करावा लागतो तितकाच यातदेखील बुद्धीचा वापर होतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या