टपाल कार्यालय फोडून तिजोरी पळविली


नगर : संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात बुधवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत या परिसरातील अनेक घरे फोडली. चोरट्यांच्या तावडीतून घारगावचे पोस्ट कार्यालयही सुटले नाही. हे कार्यालय फोडून चोरट्यांनी भिंतीत बांधलेली तिजोरीही खणून काढून पळविली. 


संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ आणि घारगाव परिसरात बुधवारी पहाटे चोरट्यांनी घरे फोडून चोरी केली. घारगाव येथे टपाल कार्यालय आहे. त्यामध्ये सिमेंट व दगडामध्ये बांधकाम केलेली लोखंडी तिजोरी होती. चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. भिंतीतील लोखंडी तिजोरी खणून कढली आणि चोरून नेली आहे. ही गोष्ट सकाळी काही नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी गावातील पोस्टमन किशोर पोळ यांना घटनेची माहिती दिली.
पोळ यांनी कार्यालयात येऊन पाहणी केली आणि वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक अधीक्षक संतोष जोशी, सबपोस्ट मास्तर सुमंत काळे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. घारगाव पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या