विना अनुदान धोरण कायमचे बंद करण्याची गरज: पोपटराव गावडे


तळेगाव ढमढेरे :


  कायम विनाअनुदान धोरण ही राज्यातील शिक्षण व्यवस्थेसमोरील सध्या मोठी समस्या असुन हे धोरण कायमचे बंद करून शासनाने ग्रामीण भागातील शिक्षण संस्थाचालकांना बळ देणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मा.आमदार पोपटराव गावडे यांनी केले. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीण तर्फे शिरूर तालुका शिक्षण संस्थाचालकांच्या सहविचार सभेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. 
यावेळी शिक्षण मंडळ पुणे ग्रामीणचे अध्यक्ष विजय कोलते, उपाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, खजिनदार शिवाजी घोगरे, सहसचिव महेशबापू ढमढेरे, विलास पाटील, श्रीकांत सातपुते, प्रकाश पवार,अनिल भुजबळ, राजेंद्र ढमढेरे, रंगनाथ हरगुडे, प्राचार्य डॉ. अशोक नवले , मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण यांच्यासह शिरूर तालुका व पुणे जिल्ह्यातील विविध संस्थाचालक, त्यांचे प्रतिनिधी व मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते.
संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीणचे अध्यक्ष विजय कोलते, उपाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, महेशबाप्पू ढमढेरे, अरविंददादा ढमढेरे, श्रीकांत सातपुते, रंगनाथ हरगुडे यांनी यावेळी उपस्थित संस्था चालकांना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील शिक्षण संस्थाचालकांनी एकत्र येणे काळाची गरज बनली आहे. संस्थाचालकांच्या अधिकारांवर गंडांतर आले असून सर्वांनी संघटित होऊन विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन यावेळी महेशबापू ढमढेरे यांनी केले. केवळ एकी अभावी संस्थाचालकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत या मुद्याकडे महेशबापू ढमढेरे यांनी आवर्जून लक्ष वेधले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जगदीश राऊतमारे केले तर विलास पाटील यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या