घरावर दरड कोसळली महिलेचा मृत्यू

मुंबई : कुर्ला येथील आंबेडकर नगर, गरीब मोहल्ला येथे एका घरावर दरड कोसळून एक महिलेचा मृत्यू झाला आहे. लता रमेश साळुंखे असे या महिलेचे नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या लता साळुंखे यांना जवळच्या कुर्ला नर्सिंग होम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. या दरड कोसळण्याच्या घटनेत मयत महिलेचे पती रमेश साळुंखे व त्यांचा मुलगा अमित साळुंखे यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. तसेच या दुर्घटनेत इतर कोणीही जखमी झालेले नसल्याची माहिती मिळत आहे. आजूबाजूच्या घरातील लोकांना तातडीने घरे खाली करण्यास सांगितले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या