“…तर नाय मातीत गाडलं, लोळवलं तर शिवसेना आपलं नाव सांगणार नाही”; भाजपाला थेट आव्हानमुंबई : “या अंगावर. काय करणार आहात तुम्ही? एक तर खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकाल, आयटी सेलचा वापर करुन बदनामीची मोहीम चालवाल.” संजय राऊत यांनी केला उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा उल्लेख  भाजपाचं हिंदुत्व हे ढोंगी, नकली आणि फसवं असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. तसेच राऊत यांनी शिवसेना केंद्रासोबत लढण्यासाठी तयार असल्याचं थेट आव्हानही या वेळेस दिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणा असो किंवा केंद्रातील सत्ता असो आम्ही लढण्यास तयार आहोत असं राऊत म्हणालेत. आमचं पॉवरचं हिंदुत्व आहे असं भाजपाकडून सांगण्यात येतं, असा प्रश्न विचारण्यात आला असता संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. ड्युप्लिकेट, ढोंग, नकली आहे त्याचं हिंदुत्व. काल उद्धव ठाकरेंनी हेच सांगितलं, सत्ता हवी असते तेव्हा हिंदू हे आहे ते आहे असं सांगितलं जातं. हिंदू पाकिस्तान, हिंदू मुस्लमान असे विषय सत्तेसाठी चर्चेत आणले जातात. सर्व काही केलं जातं. मात्र जेव्हा काम होतं तेव्हा त्यांना फेकून दिलं जातं. राजकारणामधील गरज पूर्ण झाल्यानंतर दूर लोटायचं ही त्यांची पद्धत आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या