पहिल्यांदाच पाणी सोडले आणि आली बलामात

 


 बंधाऱ्याचा भरावच गेला वाहून  

 
ओतूर,(प्रतिनिधी)



येथील रहाटी मळा येथे जिल्हा परिषदेच्या दीड कोटी रुपये निधी खर्चून बांधण्यात येणाऱ्या मांडवी नदीवरील के.टी.बंधा-याचा भराव अचानक नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने वाहुन गेला असल्याची घटना शनिवारी(दि.८) सायंकाळी घडली.
रहाटी बाबीतमळा असे के.टी.वेअर पद्धतीच्या बंधारा बांधण्याचे काम गेली अनेक दिवसांपासून सुरू आहे. चिल्हेवाडी धरणाचे पाणी मांडवी नदीला सायंकाळच्या दरम्यान सोडले होते.तसेच याबाबत स्थानिक प्रशासनाला सुरक्षितता बाळगण्याचे देखील आवाहन केले होते. या के.टी.च्या बांधकामा दरम्यान स्थानिक ग्रामस्थानी हरकती घेतल्या होत्या. त्यादूर केल्यानंतरच धरणातुन पाणी प्रवाह सोडण्यात आला होता.

या प्रवाहाच्या वेगाने नदीपात्रातील झाडे झुडपे वाहुन आली असल्याने बंधा-याजवळ पाण्याचा फुगवटा झाला.त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाने या बंधा-याजवळ असणा-या माती स्लखन होऊन उसाच्या पिकाचे तसेच शेतक-याच्या इतर बागायती पिकाचे नुकसान झाले आहे.काही शेतकऱ्यांच्या बोअरवेलचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.हे सर्व दृश्य घडताना जवळच फिरत असलेल्या काही जणांनी बघितले.यामधे कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.

नव्यानेच बांधलेल्या बंधा-याचा खर्च देखील वाया गेला आहे की काय अशी शंका स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.याबाबत संबंधित खात्याचे दोषी अधिकारी,ठेकेदार यांच्यावर कार्यवाही करावी.तसेच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.अशी मागणी जि.प.सदस्य मोहीत ढमाले यांनी केली आहे.
पाणी सोडणार असल्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्या बंधाऱ्याचे काम अपूर्ण आहे मग पाणी सोडण्याची घाई का? भरावा कामात काही गोडबंगाल तर नाही ना? संबंधितांवर नक्की कारवाई होणार का? या प्रकाराला जबाबदार कोण?
अशा प्रकारचे अनेक सवाल सामान्य जनतेतून उपस्थित होत आहेत.

निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ओतूरमधील रहाटी येथील के. टी.बंधाऱ्याच्या भराव वाहुन गेला
असून यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि संबंधितांवर कारवाई व्हावी.

भगवान घोलप , भाजप 
पुणे जिल्हा उपाध्यक्ष 
दत्तात्रय डुंबर,
जुन्नर तालुका उपाध्यक्ष 


सदर बंधाऱ्याचे काम पूर्ण झालेले नसून अद्याप बरेच काम बाकी आहे.मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने बंधारा शेजारील भराव वाहून गेला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून शेतकऱ्यांना यापुढील काळात अशा प्रकारच्या संकटाला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेता बंधाऱ्या शेजारी भिंत उभी करण्यात येणार आहे.

मोहित ढमाले
जिल्हा परिषद सदस्य 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या