पुणे :
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली असून online शिक्षण पुन्हा सुरू झाले आहे. परंतू समाजकल्याण च्या वस्तीगृहात नंबर लागूनही विद्यार्थ्यांना त्याचा काहीच लाभ झाला नाही. तसेच मागील दोन वर्षात शैक्षणिक भत्ते मिळालेले नाहीत मागचे पूर्ण वर्षही हॉस्टेल बंदच होते. त्यामुळे आपल्या शिक्षणाचा पूर्ण भार कुटुंबावर पडत आहे या विचाराने अनेकजण मानसिक तणावातून जात आहेत.
तसेच समाजकल्याण वसतिगृहातील रेक्टर कडून विद्यार्थ्यांना त्वरित 2 दिवसात हॉस्टेल खाली करा असे सांगण्यात आले. घरी मोबाईल नेटवर्कच्या समस्या आणि आर्थिक ताण असल्यामुळे अभ्यास होत नाही असं विद्यार्थ्यांनी सांगितल्यावर रेक्टर ने मुलींच्या पालकांना भीतीयुक्त फोन केले. याचबरोबर जेव्हा मुलांनी "आम्ही समाजकल्याण आयुक्तांना भेटू" असे सांगितले तेव्हा "एकही मुलगी आयुक्तांपर्यंत जाता कामा नये, जर कोणी गेट च्या बाहेर गेलं तर त्यांना मी होस्टेल ला परत येऊ देणार नाही" असे सांगत समाजकल्याण च्या आंबेगाव बुद्रुक येथील मुलींच्या वसतिगृहाच्या गेटला लॉक लावण्यात आले.
यासंदर्भात आयुक्तांशी आज बोलल्यानंतर त्यांनी सांगितले की, त्यांच्याकडून "वसतीगृहांना होस्टेल खाली करण्यासंदर्भात कोणत्याच प्रकारे नोटिस पाठवलेल्या नाहीत."
यावेळी छात्रभारतीचे राज्य संघटक अनिकेत घुले, जिल्हाध्यक्ष छाया काविरे, सम्पदा डेंगळे, दिव्या कांबळे, आनंद केंद्रे व इतर विद्यार्थी उपस्थित होते.
0 टिप्पण्या