नागरिकांनी नियमांचे पालन करुन सहकार्य करावे ; आयुक्त गुप्ता


पुणे-
  पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. राज्य शासनाने कडक निर्बंध जारी केले असून, रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी सुरु होत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करुन पोलिसांना सहकार्य करावे, कारवाईची वेळ आणू देऊ नये, असे आवाहन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.


पोलिस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले की, 'शासनाच्या नियमावलीची अंमलबजावणी पोलिस दलाकडून करण्यात येत आहे. शहरात रात्री बंदोबस्त लावण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांना सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर बाहेरगावाहून विमान, रेल्वे, बसने येणार्‍या व जाणार्‍यांनी आपल्याबरोबर प्रवासाचे तिकीट ठेवावे. हॉटेल, रेस्ट्रारंट यांना रात्री १० वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर सर्व बंद करुन त्यांना घरी जाण्यासाठी एक तासाचा अवधी देण्यात आला आहे.'

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या