सुरक्षा रक्षकांना ब्लँकेटचे वाटप


भिगवण :

 येथील रोटरी क्लबच्या वतीने खाजगी व सरकारी बँकेचे सुरक्षारक्षक व  विविध सोसायटीमधील वॉचमन यांचे कडाक्याच्या थंडीपासून रक्षण व्हावे या उद्देशाने रोटरी क्लब भिगवणच्या वतीने ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. याकामी पुण्याच्या सिनर्जी डायरेक्टर पल्लवी साबळे यांनी मदत केली.

यावेळी बोलताना रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय खाडे म्हणाले की, रात्रीचे वॉचमन किंवा पहारेकरी यांनी शेकोटी साठी वापरलेले टायर किंवा लाकूड हे जाळून धूर केल्याने पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. म्हणून ते न करता त्यांच्यासाठी उबदार ब्लँकेट वाटप करत आहोत. यावेळी सचिन बोगावत व रियाज शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या