लसीकरणाच्या सक्तीला एमआयएमचा विरोध

नगर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी  नागरिकांनावर सक्ती करता येणार नसल्याची भूमिका घेत  एमआयएमने राज्यघटनेचा दाखल देऊन लसीकरणाच्या सक्तीला विरोध केला.  

लसीकरण वाढविण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारे सक्ती करण्यात येत आहे. विविध न्यायालयांचे निवाडे आणि राज्य घटनेतील तरतुदींचीही उदाहरणे देण्यात आली आहेत. एमआयएमचे नगर जिल्हा अध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन याकडे लक्ष वेधले आहे.
एकीकडे कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी लसीकरण वेग घेत नाही. लस उपलब्ध असूनही नागरिक त्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून आढावा घेताना संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. त्यामुळे लसीकरण वाढावे, यासाठी अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात काही निर्णय घेत सक्ती करण्यास सुरवात केली आहे. नगर जिल्ह्यातही हे प्रकार सुरू झाले आहेत. याला एमआयएमने विरोध केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या