सकल मराठा समाजाच्यावतीने शंभू राज्यभिषेक सोहळा

 राजमाता जिजाऊ स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण
कर्जत :सकल मराठा समाज कर्जत यांच्यावतीने शहरात छत्रपत्री संभाजी महाराज चौकात शंभू राज्यभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्पर्धक असणाऱ्या जिजाऊ लेकीच्या हस्ते राज्यभिषेक सोहळा संपन्न झाला. राजमाता जिजाऊ जयंतीनिम्मित घेतलेल्या स्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले.
      रविवार, दि १६ जानेवारी छत्रपती शंभूराजे यांचा राज्यभिषेक सोहळा सकल मराठा समाज कर्जतच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राजमाता जिजाऊ जयंतीच्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाच्या हस्ते राज्यभिषेक सोहळा संपन्न झाला. राज्यभिषेक सोहळ्यानंतर जिजाऊ जयंतीच्या निम्मितांने सकल मराठा समाज कर्जत यांच्यावतीने वेशभूषा आणि संदेश स्पर्धा घेण्यात आली होती. त्या सर्व स्पर्धेतील ६४ विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यास्पर्धेत प्रथम क्रमांक अंजली शिंदे यांनी पटकावला तर मसीरा सय्यद आणि समृद्धी भालेराव यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. तर पल्लवी कांबळे आणि शामल मुळे यांनी उत्तेजनार्थ बक्षिसास पात्र ठरले. यावेळी सकल मराठा समाज कर्जतचे प्रमुख तालुका समन्वयक धनंजय लाढाणे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा सैनिक उपस्थित होते. 
Attachments area

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या