नाशिकमध्ये 35 एकर उसाची राख, शेतकऱ्याच्या डोळ्यांत दुःखाचा महापूर!


 नाशिकमध्ये तब्बल 35 एकरावरील ऊस जळून खाक झालाय. निफाड तालुक्यातल्या सिंगवे गावात ही घटना घडली. रामदास सानप असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. महावितरणाच्या तारांचे शॉर्टसर्किट झाले. त्याची ठिणगी उसात पडली. बघता-बघता उसाने पेट घेतला आणि काही मिनिटांत या उसाची राखरांगोळी झाली. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई मिळावी, अशी गावकऱ्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या