अबब... श्रीरामपूर, राहुरीत एकाच दिवशी 5 आत्महत्त्या


 राहुरी तालुक्यात दोघांंनी गळफास लावून तर श्रीरामपुरात दोघांसह वृद्धेने संपविले जीवन

श्रीरामपूर / राहुरी  :  उत्तर नगर जिल्ह्यातील आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. श्रीरामपुरला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार्‍या गोंधवणीच्या साठवण तलाव क्रमांक एकमध्ये उडी मारुन 65 वर्षिय वृद्धेने जीननप्रवास संपवला तर राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील स्वामीनगर येथे राहणारा हर्षल अनिल राणे या 26 वर्षीय विवाहित तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, राहुरी तालुक्यातील खडांबे बुद्रुक येथील बाळासाहेब सदाशिव धायगुडे (वय 50 वर्षे) यांनी काल (दि. 12) रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास झाडाच्या फांदीला सुताच्या दोरीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन यात्रा संपविल्याने हळ-हळ व्यक्त होत आहे. 

तब्बल तिसरी आत्महत्या..! 

यापूर्वी देखील या तलावांमध्ये आत्महत्यांचे तब्बल दोन प्रकार घडले आहेत. तलावाला वाचमेन नसल्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना तलावात घडतात. या तलावाच्या पाणी पुरवठा शहरवासियांना पिण्यासाठी केला जातो. त्यात आत्महत्येसारखे प्रकार वारंवार घडत असल्याने तलावाच्या संरक्षणासाठी वाचमेनची नियुक्ती नगरपालिकेने करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील स्वामीनगर येथे राहणारा हर्षल राणे या तरुणाने घरात कोणीही नसताना गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. काल (दि. 12) फेब्रुवारी रोजी सकाळी हर्षलचे काही मित्र घरी गेले होते. त्यांनी हर्षलला बाहेरून आवाज दिला, मात्र आतून काहीच प्रतिक्रिया आली नाही. त्यांनी खिडकीतून डोकावले असता हर्षल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी ताबडतोब शेजारील नागरिकांना सांगितले. यावेळी परिसरातील नागरिक जमा झाले. सचिन शिंदे, गोविंद कुटे, बाळू कव्हाने, वसंत कव्हाणे आदी तरूणांनी घराचा दरवाजा तोडला. यावेळी हर्षल छताच्या लोखंडी पाईपला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या