भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका : राहुलच्या क्रमांकाचा पेच; आज दुसऱ्या सामन्यासह मालिकेत विजयी आघाडीचा भारताचा निर्धार वेस्ट इंडिजला दुसऱ्या सामन्यात फलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे. आज दुसऱ्या सामन्यासह मालिकेत विजयी आघाडीचा भारताचा निर्धार


 ‘ही’ जन्मतारीख असणाऱ्या लोकांमध्ये पैसा कमावण्याची असते प्रचंड हौस, शुक्राच्या कृपेने होतात सर्व काम! ‘आपका क्या होगा जनाबे आली’ गाण्यावर धनंजय मुंडेंचा डान्स; कौटुंबिक विवाह सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल  ‘ही’ जन्मतारीख असलेल्या लोकांनावर असते धनाची देवता कुबेरांची विशेष कृपा भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी मिळवण्यासाठी सज्ज झाला असताना बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात उपकर्णधार केएल राहुलचा फलंदाजीच्या क्रमांकाचा पेच सोडवावा लागणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने सहा गडी राखून आरामात विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेमधील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ०-३ अशी हार पत्करल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने रविवारी आत्मविश्वासाने कामगिरी केली. वैयक्तिक कारणास्तव पहिल्या सामन्यातून माघार घेणारा कर्नाटकचा फलंदाज राहुल दुसऱ्या सामन्यात सलामीला उतरणार की मधल्या फळीत, हा गुंता संघ व्यवस्थापनाला सोडवावा लागणार आहे. ’ इशान संघाबाहेर? मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकलेल्या रोहितने दिमाखदार पुनरागमन केले. त्याने ६० धावांची दमदार खेळी केली. त्याचा सलामीचा साथीदार इशान किशनने ३६ चेंडूंत २८ धावा करून आपली भूमिका चोख बजावली. परंतु राहुलने सलामी केल्यास इशान संघाबाहेर जाईल. पण राहुलला मधल्या फळीत स्थान दिल्यास दीपक हुडाला जागा रिकामी करावी लागेल. दीपकने पदार्पणात ३२ चेंडूंत नाबाद २६ धावांची खेळी केली. मधल्या फळीत सूर्यकुमारने ३६ चेंडूंत ३४ धावा काढल्या. मात्र विराट कोहली (८) आणि ऋषभ पंत (११) अपयशी ठरले. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी तयारी करण्याच्या दृष्टीने भारतीय संघ प्रथम फलंदाजी करीत मोठी धावसंख्या उभारण्यासाठी उत्सुक आहे. ’ गोलंदाजीचा मारा कायम यजुवेंद्र चहल आणि वाँशिग्टन सुंदर या फिरकी गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना झगडायला लावत १७६ धावांत त्यांचा डाव गुंडाळला. चहलने चार आणि वाँशिग्टनने तीन बळी मिळवले. मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि शार्दूल ठाकूर या वेगवान गोलंदाजांनीही टिच्चून मारा केला. त्यामुळे गोलंदाजीच्या माऱ्यात कोणताही बदल केला जाणार नाही. ’ फलंदाजीत सुधारणा आवश्यक वेस्ट इंडिजला दुसऱ्या सामन्यात फलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील गेल्या १६ सामन्यांपैकी १० सामन्यांत  विंडीजला पूर्ण ५० षटके खेळता आली नाहीत. कर्णधार किरॉन पोलार्ड, फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला निकोलस पूरन यांच्यासह सर्वच फलंदाजांनी निराशा केली. मात्र अनुभवी अष्टपैलू जेसन होल्डरने झुंजार अर्धशतक नोंदवले. संघ ’ भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), मयांक अगरवाल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टिरक्षक), दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक चहर, शार्दूल ठाकूर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वाँशिग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आवेश खान, शाहरुख खान. ’ वेस्ट इंडिज : किरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियान अ‍ॅलन, एनक्रुमा बोनर, डॅरेन ब्राव्हो, शमार ब्रूक्स, जेसन होल्डर, शाय होप, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमारियो शेपर्ड, ओडियन स्मिथ, हेडन वॉल्श कनिष्ठ. कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीस सज्ज -सूर्यकुमार अहमदाबाद :  भारतीय एकदिवसीय संघाला महेंद्र्रंसह धोनीच्या निवृत्तीनंतर मधल्या फळीत सातत्याने विजयवीराची भूमिका बजावणारा फलंदाज गवसलेला नाही. मात्र, मुंबईकर सूर्यकुमार यादव या जबाबदारीसाठी तयार असून त्याची कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची सज्जता आहे. ‘‘मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करून सामन्यावर प्रभाव पाडू शकतो. फलंदाजीच्या क्रमांकाचा माझ्या खेळावर परिणाम होत नाही. मला सकारात्मक पद्धतीने फलंदाजी करायला आवडते. अवघड परिस्थितीतही नैसर्गिक खेळ करून संघाला सामने जिंकवून देण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे संघ व्यवस्थापन ठरवेल, त्या क्रमांकावर खेळण्यासाठी मी सज्ज आहे,’’ असे सूर्यकुमार म्हणाला.

वेळ : दुपारी १.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १,१ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या