मुंबई : मुंबई महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची तपासणी केली होती. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याबाबत कारवाई करण्याबाबत मुंबई महापालिकेची हालचाल सुरू झाली आहे. महापालिकेचे आठ अधिकारी सांताक्रुज पोलीस स्टेशनला पोहचले आहेत. तर, दुसरीकडे राणेंच्या बंगल्याबाहेर मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोसबस्तही तैनात करण्यात आलेला आहे. नारायण राणे हे स्वत: बंगल्यात उपस्थित असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्त्यांने अनधिकृत बांधकामप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुंबई महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची तपासणी केली होती. तसेच पथकाने बंगल्यातील बांधकामांचे मोजमाप घेऊन संबंधित कागदपत्रांची तपासणीही केल्याची माहिती समोर आली होती.
“निवडणुकीला उभे राहा म्हणून आम्ही गुळ, खोबरं दिलं होतं का?”; नाना पाटेकरांनी भर कार्यक्रमात सुनावलं
“परत असं घोड्यावर बसायचं नाही”, अमोल कोल्हेंना मिळाली तंबी
महापालिकेचे पथक राणेंच्या बंगल्यात पोहचलं आहे
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यात मुंबई महापालिकेचे पथक दाखल झाले आहे. आता या बंगल्यावर कारवाई होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सीआरझेड नियमांचे उल्लंघन करुन समुद्राच्या ५० मीटर क्षेत्रात हा बंगला बांधण्यात आल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी पालिकेकडे केली होती. तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी पालिकेला स्मरणपत्रही पाठविले होते. त्यानुसार पालिकेने या बंगल्याची पाहणी केली.
माहिती अधिकार कार्यकर्त्यांने अनधिकृत बांधकामप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल
माहिती अधिकार कार्यकर्त्यांने अनधिकृत बांधकामप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुंबई महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची तपासणी केली होती. तसेच पथकाने बंगल्यातील बांधकामांचे मोजमाप घेऊन संबंधित कागदपत्रांची तपासणीही केल्याची माहिती समोर आली होती.
केंद्रीयमंत्री नारायण राणे स्वत: जुहू येथील बंगल्यात हजर
महालापालिकेकडून कारवाईची शक्यता असताना, केंद्रीयमंत्री नारायण राणे हे स्वत: त्यांच्या जुहू येथील अधीश या बंगल्यात हजर आहेत.
जे सुडाचं राजकारण सरकारला करायचं आहे, ते करावं. न्यायालय आहेत ते योग्य तो निर्णय घेतील असं राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
महापालिकेकडून बंगल्यावर कारवाई केली जाणार असल्या पार्श्वभूमीवर, नारायण राणेंच्या बंगल्या बाहेर कुठलाही अनुचित प्रकार किंवा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाईसाठी महापालिकेच्या हालचाली सुरू
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्याबाबत कारवाई करण्याबाबत मुंबई महापालिकेची हालचाल सुरू झाली आहे. महापालिकेचे आठ अधिकारी सांताक्रुज पोलीस स्टेशनला पोहचले आहेत.
0 टिप्पण्या