निसर्गप्रेमी सयाजी शिंदे यांच्या 'सह्याद्री देवराई'ला भीषण आग, २ एकरावरील झाडं जळून खाक


बीड :
सिनेअभिनेते निसर्गप्रेमी सयाजी शिंदे यांच्या कल्पनेतून उभ्या राहिलेल्या बीडमधील सह्याद्री देवराईला भीषण आग  लागली. या आगीत जवळपास दोन एकरावरील 500 झाड जळून खाक झाली आहेत. मात्र या आगीबद्दल वेगळाच संशय व्यक्त होतोय. आग लागली नसून लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सह्याद्री देवराईला आग लागल्याने जवळपास दोन एकरचा परिसर जळाला असून यामुळे पाचशेच्या आसपास वड, लिंबू, पिंपळ आदी झाड जळून खाक झाले आहेत. दरम्यान या झाडाविषयी सह्याद्री देवराईसाठी काम करणाऱ्या, सामाजिक कार्यकर्त्यांसह वृक्षप्रेमींनी संवेदना व्यक्त करत, ज्याने कोणी हे केलंय आहे, त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी गेल्या चार वर्षांपूर्वी 14 फेब्रुवारी या दिवशी, बीड पासून काही अंतरावर सह्याद्री देवराईची जोपासना केली होती. आज हेच सह्याद्री देवराई एक पर्यटन केंद्र बनत चालले आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी या ठिकाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील जमते. कारण जगातलं पहिलं वृक्ष संमेलन याच सह्याद्री देवराई मध्ये झालं होतं. दरम्यान, बीड जिल्ह्यात पडत असणारा सततचा दुष्काळ, कुठे तरी दूर व्हावा आणि जिल्ह्यात पर्यटन केंद्र बनावे, या उद्देशाने अभिनेते सयाजी शिंदे यांनी ही सह्याद्री देवराईची स्थापना केली होती. मात्र काही वाईट विकृतीच्या लोकांकडून कुठंतरी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जातंय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या