युक्रेनने रशियाचं लष्करी विमान पाडलं


रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच मोठी घडामोड समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. पुतिन यांनी रशिया विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करत असल्याचं सांगितलं असून या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असंही ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घऱी निघून जा असंही सांगितलं आहे. इतकंच नाही तर अमेरिकेसह इतर युरोपला मधे पडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. युक्रेनने रशियाच्या एअर स्ट्राइकला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रशियाचं लष्करी विमान पाडलं असल्याची माहिती युक्रेनने दिली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत अनेक देशांनी रशियाने पुकारलेल्या युद्धाविरोधात आवाज उठवला असून युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. युरोपमध्ये नवं युद्ध होण्याची भीती असल्याने त्यांनी मध्यस्थीची विनंती केली आहे. महत्वाचं म्हणजे नेहमी रशियाची बाजू घेणाऱ्या चीननेही देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सीमांचा आदर करण्यासंबंधी भाष्य केलं आहे.

युक्रेनध्ये एअर रेड सायरन वाजला

युक्रेनची राजधानी कीवमध्ये शहर हल्ल्याखाली असल्याचं दर्शवणारे एअर रेड सायरन्स वाजले आहेत. युक्रेनमधून थेट जर्मनीपर्यंत जाणाऱ्या नॉर्ड स्ट्रीम – २ या वायूवाहिनी किंवा गॅस पाइपलाइनच्या मुद्द्यावरून हा संघर्ष सुरू झाल्याचा एक मतप्रवाह आहे. रशियातील नैसर्गिक वायू आणि इतर जीवाश्म इंधने अशा प्रकारे पाइपलाइनच्या माध्यमातून पश्चिम आणि दक्षिण युरोपभर पोहोचली, तर रशियाचे युरोपातील महत्त्व कितीतरी वाढेल अशी भीती वाटल्यामुळेच अमेरिकेने हा वाद उकरून काढल्याची टीका रशियावादी विश्लेषक करतात. नॉर्ड स्ट्रीम – २ पाइपलाइन त्यामुळेच चर्चेच्या केंद्रस्थानी आलेली आहे. रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे खिशाला बसणार फटका; भारतात ‘या’ गोष्टी महागणार रशिया-युक्रेनच्या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगासह भारतातही पहायला मिळणार आहेत. या युद्धामुळे भारतात मोठ्या प्रमाणात महागाई वाढू शकते. कोणत्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात, याबद्दल तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. यामध्ये नैसर्गिक वायू, पेट्रोल, डिझेल, गहू, धातू महाग होऊ शकतं. तर एलपीजी, केरोसीन अनुदान वाढू शकतं.

युक्रेनकडून 'मार्शल लॉ'ची घोषणा; नागरिकांना केलं आवाहन

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मार्शल लॉची घोषणा केली आहे. तसंच रशियाने हल्ला सुरु केला असली तरी घाबरु नका असं आवाहन केल्याचं वृत्त AP ने दिलं आहे. 'मार्शल लॉ' घोषित केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचे हक्क काढून घेत देशाच्या कामकाजावर लष्कराचं नियंत्रण आणलं जातं.

युक्रेनच्या राजधानीतील सध्याची स्थिती युक्रेनची राजधानी कीवच्या एअरस्पेसची स्थिती

युक्रेनमधून विशेष विमान दिल्लीत दाखल

युक्रेनमधील भारतीयांना घेऊन येणारं विशेष विमान दिल्लीत दाखल झालं आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या