तपासामध्ये पत्रकार बांधवांचे महत्त्वाचे योगदान पोलीस निरीक्षक : संजय सानप
वडाळा महादेव : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा येथील अपहरण झालेली मुलगी काही तासातच आई-वडिलांच्या स्वाधीन केल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती भोर उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संदीप मिटके साहेब यांचे आदेशानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी तपासामधील यंत्रणेत सहभागी झालेले पोलीस कर्मचारी पत्रकार बांधव पोलीस मित्र यांचा श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे सन्मान करण्यात आला
प्रसंगी श्री सानप यांनी मुलीचे अपहरण झाल्याबद्दल मुलीच्या आई कडून माहिती घेत पोलीस कर्मचारी यांना तपासाबाबत माहिती दिली यावेळी येथील पो हे काँ संतोष परदेशी पोलीस नाईक किरण पवार पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार तुषार गायकवाड गृहरक्षक दलाचे - तथा पत्रकार राजेंद्र देसाई पोलीस मित्र गणेश गायकवाड अशोक बनकर यांनी तपास चक्र फिरवत मुलीची शोधमोहीम सुरू केली यावेळी राजेंद्र देसाई यांनी व्हाट्सअप तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार बांधवांना सदर मुलीबाबत तसेच अपहरण करणाऱ्या व्यक्तीचे तसेच गाडीचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केले यामुळे तपासात गती येत सदर मुलगी पांगरी येथे असल्याची माहिती पत्रकार शंतनु कोरडे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाणे या ठिकाणी कळवली यासाठी त्यांना पोलीस मित्र शांताराम वारुळे यांनी मदत केली मुलगी मिळाली असल्याने पोलीस नाईक किरण पवार तुषार गायकवाड महेश पवार राजेंद्र देसाई गणेश गायकवाड अशोक बनकर यांनी मुलीच्या आई सोबत घेत नाशिक जिल्ह्यातील पांगरी येथे वारुळे यांच्या ताब्यातील मुलगी आईच्या स्वाधीन केली या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी तपास यंत्रणा मधील सर्व पत्रकार पोलीस कर्मचारी पोलीस मित्र यांचा सन्मान केला यावेळी श्री सानप यांनी या तपास यंत्रणांमध्ये श्रीरामपूर येथील पत्रकार बांधवांचे भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले तसेच व शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे स पो नि श्री जीवन बोरसे पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष परदेशी पोलीस नाईक संतोष दरेकर शफिक शेख किरण पवार गणेश भिंगारदे सोमनाथ गाडेकर पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे गौतम लगड गौरव दुर्गुळे महेश पवार रघुवीर कारखिले श्री गुंजाळ बिराप्पा करमल आदी यावेळी उपस्थित होते राजेंद्र देसाई यांनी सर्वांचे आभार मानले
0 टिप्पण्या