तरुणांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचे षडयंत्र...

 अल्पसंख्याक समाजातील राजकारणात ठसा उमटवु पाहणाऱ्या तरुणांना  जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचे  षडयंत्र...श्रीरामपूर :


शहरातील मुस्लिम समुदायातील एक उच्च शिक्षित विधिज्ञ तरुण समीन बागवान  वॉर्ड  नं/2 मधुन राजकारणातून समाजकारणाचा वसा हाती घेऊन अनेक प्रश्न आपापल्या नेत्यांच्या मदतीने सोडवत असताना, त्यांचे काम पाहून काही विघ्नसंतोषी लोकांना पोटशूळ उठले आहे.  

याला मुख्य कारण ते मुस्लिम  समाजातील असल्याने त्यांना टार्गेट करणे परंतु संबंधित राजकीय पुढाऱ्यांचे मनसुबे आम्ही उधळून लावू असे मत वार्ड न.2 मधील सामाजिक कार्यकर्ते रईसभाई जहागीरदार यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते विधिज्ञ समीर बागवान यांना काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी एका कार्यक्रमामध्ये टार्गेट करून त्यांच्यावर राग व्यक्त केला बागवान यांना काँग्रेस पक्षात मिळालेले स्थान व त्यांचे काम करण्याची पद्धत यामुळे त्यांची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन त्यांना काँग्रेस पक्षाने चांगली पदे दिली आहेत एक अल्पसंख्यांक तरूण एवढ्या मोठ्या पदापर्यंत जाऊन मजल मारतो व राज्यातील नेतृत्वाकडून कुठलेही काम असो करून आणतो व त्याला येथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मदत करतात म्हणून काही विघ्नसंतोषी लोकांनी फक्त बागवान हे अल्पसंख्यांक समाजाचे असल्याने त्यांना राजकारणात पुढे जाऊन द्यायचे नाही म्हणून टार्गेट केले जात आहे परंतु असे अल्पसंख्यांक समाजाच्या तरुणावर अन्याय होणार असेल तर ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही त्याविरोधात आम्ही मोठे जनआंदोलन उभारू असे ही जहागीरदार यांनी सांगितले. . 


ही टार्गेट करणारी व्यक्ती नेहमीच सोयीनुसार अंथरून टाकत असते. कारण ज्या लोकांनी यांना डीएनए चाचणी करण्याचा सल्ला दिला,त्यांच्याकडून यांनी मलई पेढा भरून घेतला हे श्रीरामपूर तालुक्यातील लोकांना चांगलेच माहिती आहे.  आणि आता तीच लोकं स्व.जयंतराव ससाणे यांचे कार्यकर्ते फक्त आम्हीच असल्यागत ठेका मिरवून ठेकेदारीचा मक्ता उचलत आहे. ही लाचारीची परिसीमा ओलंडलेली लोकं आता समीन बागवान यांना काहीतरी कारण काढून टार्गेट करीत आहे. मुळात शहराला व तालुक्याला माहीत आहे संपुर्ण समाजाच्या जीवावर हे मोठे झाले आहेत, 


बागवान जनतेची कामे करण्याचा विशेष हातखंडा असून त्यांच्याप्रती मुस्लीम समुदायसह सर्व धर्मीय आदर आहे. 

परंतु ही  प्रस्थापित गर्विष्ठ लोकं जर मुस्लिम समुदायातील व्यक्तीना हा टार्गेट करण्यासाठी सोपा आहे असे समजून त्यातून काही स्वार्थी उद्योग साधण्याचा प्रयत्न करीत आहे. 

      अशा लाळचाटु लोकांना जनतेप्रति आदर शिल्लक न राहिल्याने त्यांच्या पोटात पोटशूळ उठले आहे. 

अशाप्रकारे बराच जणांना नेहमीच जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न या लाचारीचे पेढे खाणाऱ्या व्यक्तीने स्व. ससाणे यांचे नाव घेऊन प्रेमाचा उसना आव आणून खोटी, मतलबी व पोटभरू सहानुभूती  

दाखवून समाजात स्वतःची लायकी आमच्या हातून तपासून घेऊ नये...

मुळातच गेल्या अनेक दशकांपासून वॉर्ड नं.2 च्याच मतांवर आपली राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग करत असताना आता मात्र 'ध' चा 'मा' करून स्वार्थ साधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, अशा प्रकारातुन स्वतःला नेता म्हणवणाऱ्या काही लोकांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे...

समीन बागवान यांच्या सोबत झालेल्या  कृत्याचा जाहीर निषेध करतो असेही जहागीरदार यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या