'पहले हिजाब-फिर किताब' बीडमध्ये मुस्लिम तरुणांची बॅनरबाजी, वाचा नेमकं वादाचं मूळ काय ?


बीड :
विद्यार्थीनींनी शाळा-कॉलेजात बुरखा घालून येण्यावरुन कर्नाटकमध्ये वाद झाला होता आणि त्याच वादाचे पडसाद आता बीडमध्ये उमटले आहेत. 'पहले हिजाब, फिर किताब... क्यों की हर किमती चीज पर्दे में हीं होती है', अशा आशयाचे बॅनर शहरात लावण्यात आलेले आहेत. बीडमध्ये फ्लेक्सबाजी 'पहले हिजाब, फिर किताब अशा आशयाचे बॅनर फारुखी लूखमान नावाच्या एका विद्यार्थी नेत्याने बीड शहरातील शिवाजी महाराज चौक, बशीर गंज चौक, राजुरीवेस परिसर या ठिकाणी लावले गेले आहेत. हिजाब किताबच्या तुलेनवरुन बीडमधील बॅनर शहरात तसंच राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मुस्लिम तरुणांचं म्हणणं काय मागील शेकडो वर्षापासून मुस्लिम महिला, विद्यार्थीनी हिजाब घालतात. मग आताच नेमकं असं काय झालं, की हिजाब घालू नका, असे फतवे निघायला लागले? भारताचं काय पाकिस्तान करायचं आहे का? कुणी काय घालायचं, हे ज्याचं त्याला ठरवू द्या ना, तुम्ही कशाला सांगताय?, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना कर्नाटकमध्ये निवडणुका असल्यानेच भाजप अशा प्रकारे वाद निर्माण करत असल्याचं मुस्लिम तरुणांचं म्हणणं आहे. दरम्यान,भारत एक देश असून त्याला एकच राहूद्या. शाळा कॉलेजात इतर मुली मंगळसूत्र घालून येतात, कपाळाला कुंकू असतं, मुलांच्या कपाळावर भगवा टिळा असतो, पण आम्हाला त्याचा कधी काहीच प्रोब्लेम नसतो. कारण प्रत्येकजण आपापल्या संस्कृतीनुसार राहतो. भारत सर्वधर्मसमभाव मानणारं राष्ट्र आहे. मग अलीकडच्या काळात याच भारतात असहिष्णुता कोण निर्माण करतंय? असा सवाल बीडमधील मुस्लिम तरुण विचारत आहेत. कर्नाटकात 'हिजाब'वरुन वादंग का उठलाय? कर्नाटकातील हिजाबचा वाद जानेवारी महिन्यात उडपी शहरात सुरू झाला होता. शहरातील प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये सहा विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्यामुळे वर्गात प्रवेश नाकारण्यात आला. कॉलेज प्रशासनाने शाळेच्या ड्रेसकोडचं कारण पुढे केलं. यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वाद वाढत गेला. अनेक संस्थांमध्ये मुली हिजाब घालून येऊ लागल्या, नंतर विरोध म्हणून विद्यार्थी भगवा गमचा परिधान करुन येऊ लागले. कर्नाटकातील शाळा-महाविद्यालये तीन दिवसांसाठी बंद हायकोर्टात सुरु असलेली सुनावणी आणि राज्यात विविध ठिकाणी सुरु असलेला वाद पाहता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यातील सर्व हायस्कूल आणि कॉलेज ३ दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली. त्यांनी विद्यार्थी आणि शाळा-कॉलेज व्यवस्थापनाला शांतता राखण्याचे आवाहन केले. हिजाबवादावर मंगळवारी पुन्हा सुनावणी कर्नाटकातील शाळा महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावरून झालेल्या वादावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयात हिजाब परिधान करून शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या वकिलांच्या वतीने सरकारचे महाधिवक्ता आणि वकिलांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आजची सुनावणी संपवली असून बुधवारी दुपारी अडीच वाजल्यापासून या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या