काँग्रेस ‘टुकडे टुकडे गँग’ची लीडर बनलीय : मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ फेब्रुवारी) लोकसभेत या चर्चेला उत्तर दिलं. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांचा समाचार घेतला.

अर्थसंकल्पीय संसद अधिवेशन सुरू असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणावर सत्ताधारी आणि विरोधकांमधील विविध खासदारांची भाषणे पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ फेब्रुवारी) लोकसभेत या चर्चेला उत्तर दिलं. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांचा समाचार घेतला. तसेच सरकारच्या धोरणांबाबत भूमिका स्पष्ट केली.

करोना संकट काळात मजुरांची काळजी घेण्याची जबाबदारी केंद्र सरकारची पण होती. अनेक महिने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कामगारांना सांभाळलं आणि नंतर त्यांनी गावाला जायचं असा आग्रह धरला. तेव्हा त्यांच्या व्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यायला पाहिजे होती, पण केंद्र सरकारने जबाबदारी नाकारली. तेव्हा शेवटी महाविकास आघाडीने रेल्वेच्या तिकिटांची व्यवस्था केली. ती जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारायला हवी होती, ती आम्ही घेतली. मजुरांची व्यवस्था केली. खरं म्हणजे याचं कौतुक होणं आवश्यक होतं. पंतप्रधान मोदींनी ते केलं नाही. मात्र, जो मजूर बिहार-उत्तर भारतातला आहे तो आमचे महाविकास आघाडीचे कौतुक करतो की त्यांनी आम्हाला चांगलं सांभाळलं. पंतप्रधानांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. ते त्यांच्या पदाला शोभणारे नाही. करोनाचे संकट आले तेव्हा लाखो मजूर परराज्यातले होते. आम्ही त्यांची कुटुंबाप्रमाणे काळजी घेतली. जेव्हा मजुर गावाकडे जायचं असा आग्रह करू लागले, तेव्हा त्यांची पाठवणूक सुद्धा अत्यंत व्यवस्थित केली. तिकिटे काढली, जेवणाचा डबा दिला. याचे कौतुक पंतप्रधान यांनी केलं असतं, तर आनंद झाला असता. राजकारण कोणत्या थराला जाऊन करावं याबाबतीत मात्र पंतप्रधान चुकले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या