मस्तीच्या मूडमध्ये दिसले टीम इंडियाचे खेळाडू; शिखर धवन, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांचा ड्रामा व्हिडीओ व्हायरल


भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू मैदाना व्यतिरिक्त सोशल मीडियावर सक्रीय असतात. काही खेळाडू मैदानावर छाप सोडण्यासोबतच सोशल मीडियावर आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकताना दिसतात. यात युजवेंद्र चहल आणि शिखर धवन हे खेळाडू आघाडीवर आहेत. वेळोवेळी ते त्यांचे व्हिडीओ किंवा इन्स्टा रील सोशल मीडियावर शेअर करत असतात. यामुळे यूजर्सचे मनोरंजन होतं. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये युजवेंद्र चहल हा शिखर धवन आणि कुलदीप यादवसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये युजवेंद्र चहल लिंबू चाटताना दिसत आहे. त्यादरम्यान तो शिखर धवनला लिंबू आंबट म्हणत तक्रार करत आहे.

युजवेंद्र चहलने हा प्रश्न विचारताच शिखर धवनचे हावभाव बघण्यासारखे आहेत. धवन म्हणतो की, तुला गोड लिंबू कुठून मिळतं, मला सांग मी घेऊन येतो. त्यानंतर कुलदीप यादव हसताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

हा व्हिडीओ युजवेंद्र चहल आणि शिखर धवन व्यतिरिक्त कुलदीप यादवने शेअर केला आहे. शिखर धवनने शेअर केलेल्या व्हिडीओला सोशल मीडियावर आतापर्यंत २.५ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत आणि युझवेंद्र चहलने शेअर केलेल्या व्हिडीओला १.६ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. ज्यावर बॉलीवूड अभिनेता अपारशक्ती खुराना व्यतिरिक्त, भारतीय संघाचे खेळाडू दीपक हुडा आणि सूर्य कुमार यादव यांनी लाईकसह त्यांच्या मजेदार प्रतिक्रिया कमेंट केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या