सचिन गुजर यांचा थयथयाट नेमका कशासाठी?


श्रीरामपूर :
आ. लहू कानडे यांच्या उक्कलगाव येथील कार्यक्रमातून अ‍ॅङ. समीन बागवान यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष, शिर्डी संस्थानचे विश्वस्त, सचिन गुजर यांनी काढता पाय घेतला. गुजर यांचीच रि ओढत माजी उपनगराध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनीही या कार्यक्रमातून निघून जाणे पसंद केल्याने त्यांचेही राजकीय अज्ञान चव्हाट्यावर आल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे. 

दरम्यान, सचिन गुजर यांची भूमिका नेहमीच काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण करणारी असल्याचे काँग्रेसच्या गोटातून ऐकू येते. श्रीरामपुरचे माजी आ. स्व. जयंतराव ससाणे व माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांच्यातील  मतभेदामागेही गुजर यांची भूमिका महत्वपूर्ण होती, असे काही काँग्रेस पदाधिकार्‍यांचे म्हणणे होते.  पुन्हा दोन दिवसांपूर्वीच्या उक्कलगावातील कार्यक्रमातील वक्त्यांचे बोलणे गुजर यांनी नाहक अंगावर घेतल्याचे बोलले जात आहे. 

गुजर यांनी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष, शिर्डी संस्थानचे विश्वस्त, मुळा-प्रवराचे माजी व्हा. चेअरमन, बाजार समितीचे माजी सभापती अशी अनेक पदे भूषविले. आपल्या वक्तृत्वाने अनेकांना नामोहरम करणारे गुजर यांना आ. लहू कानडे यांच्या उक्कलगाव येथील कार्यक्रमात मात्र अ‍ॅड. समीन बागवान यांच्या बोलण्याचा भलताच राग आला. त्यातूनच त्यांनी थयथयाट केला. एकाच पक्षाचे दोन कार्यकर्ते अशा पद्धतीने जनतेसमोर जाहिरपणे व्यक्त झाल्याने तालुक्यासह श्रीरामपूर शहरात तो एक चर्चेचा विषय झाला.

उक्कलगावच्या कार्यक्रमात आ. कानडे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, सचिन गुजर, ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, सुधीर नवले, राजेंद्र पाऊलबुद्धे, ज्ञानेश्वर मुरकुटे, अ‍ॅड. समीन बागवान असे  प्रमुख उपस्थित होते.

सर्वांची भाषणे झाल्यानंतर ज्ञानेश्वर मुरकुटे उशिरा आल्याने त्यांना भाषणाला बोलावण्यात आले. अशोक कारखान्याच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्या विरोधात गुजर यांनी काम केले. उपस्थितांनी आग्रह केल्याने जिल्हा काँग्रेसचे सचिव अ‍ॅड. समीन बागवान यांना बोलण्यास सांगण्यात आले. बागवान हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. सक्रिय राजकारणाशी त्यांचा फार संबंध नाही, परंतु आ. कानडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी तालुक्यात प्रतिमा निर्माण केली. आ. कानडे यांना कधीही चुकीचा सल्ला न देता तालुक्यातील जनता व आ. कानडे यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे कार्य अ‍ॅड. बागवान करतात. एक सुशिक्षित तरुण मुद्देसूदपणे भूमिका मांडत असताना या बोलण्याचा विपर्यास करून गुजर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने केलेला थयथयाट अनेकांना अनाकलनीय वाटला.

अ‍ॅड. बागवान यांनी माजी आमदारांना फारसे तांत्रिक ज्ञान नसल्याने फारसा निधी ते आणू शकले नाहीत, मात्र आ. कानडे प्रशासकीय अधिकारी राहिल्याने व प्रशासनातील अनेक खाचाखोचा माहित असल्याने गेल्या दोन वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी श्रीरामपूर मतदार संघाला त्यांनी मिळवून दिला. त्यातून अनेक दर्जेदार कामे झाली. सध्या सुरू आहेत, असे सांगितले. ते हे सांगत असताना त्यांचा रोख माजी आ. स्व. जयंतराव ससाणे यांच्याकडे मुळीच नव्हता, हे तेथील उपस्थितांनासुद्धा कळत होते. गुजर यांनासुद्धा ते कदाचित कळत होते, पण त्यांच्या बुद्धीला मात्र ते वळत नव्हते. राज्यात सर्वाधिक निधी आणणारे आमदार म्हणून स्व. जयंतराव ससाणे यांचा नावलौकिक होता. ससाणे यांचे बोट धरूनच अ‍ॅड. बागवान राजकारणात आले आहेत. तसे ते जाहीरपणे म्हणाले. स्व. ससाणे साहेबांबद्दल मनामध्ये सदैव आदर असून, त्यांचा रोख तालुक्याच्या नेमकं कोणत्या माजी आमदाराबद्दल होता, हे सर्वांना उमगले होते, मात्र त्यांच्या वाक्याचा विपर्यास करून गुजर यांनी माजी आ. मुरकुटे, स्व. ससाणे, कांबळे, स्व. पवार या सर्वांना मध्ये घेऊन बागवान यांच्या बद्दलचा मनातला तिरस्कार व रोष व्यक्त करुन जणू स्वतःचे हसे करून घेतले.

गुजर यांनी बागवान यांच्या माध्यमातून आ. कानडे यांच्यावर निशाणा साधण्यातचा प्रयत्न केल्याची चर्चा आता तालुक्यात होत आहे. यापूर्वी स्व. ससाणे - कांबळे यांच्या काळात तालुक्याची बरीचशी सूत्रे गुजर यांच्या ताब्यात होती. विविध खात्यांच्या अधिकार्‍यांना फोन करून कधी स्व. ससाणे, कांबळे तर कधी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नावाचा वापर करून ते अधिकार्‍यांना कामे करण्यास भाग पाडत, अशी चर्चा सुरु आहे, परंतु आ. कानडे यांनी स्वतःचे कार्यालय सुरू केल्याने व स्वतःची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून तालुक्यात विकास कामांचा सपाटा लावल्याने आपली दुकानदारी बंद होते कि काय, या भितीने सध्या गुजर यांना ग्रासले आहे. त्यामुळे बागवान यांच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला टार्गेट करून आ. कानडे यांच्यावर थेट निशाणा साधण्याचे काम त्यांनी केले, अशी चर्चा त्या ठिकाणी सुरु होती.

बागवान हे जिल्हा काँग्रेसचे सचिव आहेत तर गुजर हे कार्याध्यक्ष आहेत. जिल्हा कार्यकारिणीच्या दोन्ही पदाधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्याचे तेथे दिसले. यातून गुजर यांनी नको त्या पद्धतीने त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली, हे तेथे उपस्थित असलेल्या अनेकांना खटकले. स्व. ससाणे साहेबांच्या नावाने इमोशनल ब्लॅकमेलिंग करून करण ससाणे यांनासुद्धा त्यांनी तेथून उठण्यास भाग पाडले. त्यामुळे गुजर यांचा हा सर्व थयथयाट कशासाठी, ही चर्चा मात्र सध्या तालुक्यात रंगली आहे.

सडेतोड उत्तर देण्यात येईल..!              

गुजर यांनी उक्कलगावच्या कार्यक्रमात ज्या पद्धतीने बागवान यांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल सोशल मीडियावर मोठा गदारोळ उडाला. शहरातील तरुणाई बागवान यांच्या पाठिशी उभी आहे. आम्ही खरे काँग्रेसचे निष्ठावंत आहोत. स्व. ससाणे यांच्या नावाखाली आम्ही कुठलाही फायदा लाटला नाही. त्यामुळे आम्हाला कोणी निष्ठा शिकवू नये, अशा पद्धतीचे मेसेज सोशल माध्यमातील विविध ग्रुपवर टाकण्यात आले. गुजर यांनी बागवान यांना भविष्यात टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सडेतोड उत्तर देण्यात येईल, असेही या तरुणांनी सोशल माध्यमावर नमूद केले आहे.

ससाणे यांचे पद कोणी हिरावले..!

शिर्डी संस्थानच्या विश्वस्त पदासाठी काँग्रेसच्या कोट्यातून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी करण ससाणे यांचे नाव फायनल केले असताना ससाणेंना किती पदे देता, असे सांगून ससाणे यांना विश्वस्तपद देण्यास कुणी विरोध केला? ते पद स्वतःच्या पदरात पाडण्यासाठी ना.थोरात यांच्यावर कोणत्या पद्धतीने कोणी दबाव आणला, याची चर्चा उक्कलगावच्या कार्यक्रमात होत होती. करण ससाणे यांनी अजूनही आपल्या गटातील कोण आपला आहे, याची ओळख करून घ्यावी. संधीसाधू लोकांपासून त्यांनी सावध रहावे, असे मत एका कार्यकर्त्यांने बोलताना त्या ठिकाणी व्यक्त केले.

ससाणे यांचे पद कोणी हिरावले..!

शिर्डी संस्थानच्या विश्वस्त पदासाठी काँग्रेसच्या कोट्यातून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी करण ससाणे यांचे नाव फायनल केले असताना ससाणेंना किती पदे देता, असे सांगून ससाणे यांना विश्वस्तपद देण्यास कुणी विरोध केला? ते पद स्वतःच्या पदरात पाडण्यासाठी ना.थोरात यांच्यावर कोणत्या पद्धतीने कोणी दबाव आणला, याची चर्चा उक्कलगावच्या कार्यक्रमात होत होती. करण ससाणे यांनी अजूनही आपल्या गटातील कोण आपला आहे, याची ओळख करून घ्यावी. संधीसाधू लोकांपासून त्यांनी सावध रहावे, असे मत एका कार्यकर्त्यांने बोलताना त्या ठिकाणी व्यक्त केले.


ही त्यांची जुनी पद्धत..!

सर्व पदे मलाच मिळाली पाहिजे. मी सांगेन तसेच झाले पाहिजे. हा गुजर यांचा नेहमीच अट्टाहास असतो. जलीलभाई पठाण मुळा-प्रवराचे व्हाईस चेअरमन असताना हे पद आपल्याला मिळावे, यासाठी त्यांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे व माजी आ. स्व.जयंतराव ससाणे यांच्याकडे आग्रह धरला होता. जलीलभाई यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यासाठी, त्यांचीसुद्धा अशाच पद्धतीने बदनामी करण्याचा प्रयत्न झाला होता. हा इतिहास देखील तालुक्यामध्ये सर्वश्रूत आहे. सध्या काँग्रेसमध्ये मुस्लिम समाजाला डावलण्याचे काम सुरू आहे. त्याला गुजर यांच्यासारखे कार्यकर्ते कारणीभूत आहेत. त्यामुळे मुस्लीम समाजानेसुद्धा आता हे समजून घेण्याची गरज आहे, असे मत मुस्लीम समाजातील जाणकार कार्यकर्त्यांने नाव न छापण्याच्या बोलीवर व्यक्त केले.


गुजर यांनी मैदानात उतरावे..!

मागील नगरपालिका निवडणुकीत अ‍ॅड.समीन बागवान अचानक संजय नगर भागातून उभे राहिले होते. त्यावेळी त्यांना तीनशे पेक्षा जास्त मते मिळाली होती. सचिन गुजर यांची जनमानसात काय किंमत आहे, याची पडताळणी करण्यासाठी त्यांनी आगामी काळात होणार्‍या पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेची निवडणूक एखाद्या भागातून लढवावी आणि आपल्या मागील जनमत आजमावून घ्यावे, असा खोचक सल्ला एका तरुण कार्यकर्त्यांने या निमित्त दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या