हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथांचा इशारा; म्हणाले, “गजवा-ए-हिन्दचं स्वप्न पाहणाऱ्यांनी…”


“राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी भगवे कपडे घालावेत असं मी म्हणून शकतो का?, तर नाही असं मला म्हणता येणार नाही.”

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये आज राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधी ट्विट करुन गजवा-ए-हिंदचं स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्न कयामतच्या दिवसापर्यंत पूर्ण होणार नाही असं म्हटलंय. एएनआयला दिलेल्या मुलखातीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन भारत आकार घेत असल्याचं म्हटलं आहे. या नव्या भारतामध्ये सर्वांचा विकास होईल कोणासोबतही भेदभाव केला जाणार नाही असं योगी म्हणाले आहेत. नवीन भारत संविधानानुसार काम करेल शरीयतप्रमाणे नाही असंही योगी म्हणाले आहेत. हिजाबवरुन देशामध्ये सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर योगींनी केलेल्या या वक्तव्यामधून त्यांनी सांकेतिक पद्धतीने विरोधकांना इशारा दिलाय. गजवा-ए-हिंदचं स्वप्न कयामतच्या दिवसापर्यंत पूर्ण होणार नाही, असंही योगी म्हणालेत. कर्नाटकमधील हिजाब वादावर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी देशातील कारभार हा संविधानानुसारच चालणार असं म्हटलंय. आपण आपले धार्मिक विचार देश आणि येथील संस्थांवर लादू शकत नाही, असंही योगींनी स्पष्ट केलंय. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी भगवे कपडे घालावेत असं मी म्हणून शकतो का?, तर नाही असं मला म्हणता येणार नाही. लष्करामध्ये कोणालाही कोणताही पोशाख घालण्याची परवानगी देता येईल का? तशाच पद्धतीने शाळांमध्ये ड्रेसकोड आवश्यक आहे, असं योगी म्हणालेत. भारत शरीयतनुसार चालणार नाही तर संविधानानुसार चालणार आहे हे तालिबानी विचारसणी असणाऱ्यांनी लक्षात ठेवावं असा इशारा योगींनी ट्विटरवरुन दिलाय. ‘गजवा-ए-हिन्द’ का स्वप्न पाहाणाऱ्यांनी असं म्हणत योगींनी हिजाब वादामध्ये विद्यार्थ्यांचं समर्थन करणाऱ्यांना टोला लगावलाय. भाजपा विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही या विरोधकांनी केलेल्या आरोपांवरही योगींनी या मुलाखतीमध्ये उत्तर दिलं आहे. भाजपाने आपलं लोक संकल्प कल्याण पत्र जारी केलं आहे. या संकल्पाला इतर कोणाताही पर्याय नाहीय. भाजपाने आपल्या संकल्प पत्रामध्ये राष्ट्रवाद, सर्वांचा विकास आणि गरिबांच्या कल्याणाचा उत्तले खेलाय. ही सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत. पंतप्रधान मोदींनी देशाच्या राजकारणाचा अजेंडा बदललाय, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. आधी देशामध्ये जात, धर्म आणि कुटुंबाच्या आजूबाजूला राजकारण फिरायचं. आता देशामधील राजकारण हे विकास, चांगली सरकार, गरीबांचं कल्याण, गाव, महिला, शेतकरी आणि तरुणांच्या विषयावर होतंय, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. ३०० जागा जिंकण्याच्या आपल्या दाव्यावर योगी आदित्यनाथ ठाम असल्याचं या मुलाखतीमधून पुन्हा दिसून आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व, जनतेच्या आशीर्वादाने राज्यात पुन्हा डबल इंजिन सरकार येणार आहे. सध्याची निवडणूक ही ८० विरुद्ध २० अशी झालीय. पहिल्या टप्प्यातील मदतानानंतरच सपा, बसपा आणि काँग्रेस निराश अशून भाजपा प्रचंड बहुमतासहीत सत्तेत येणार असल्याचं भाकित योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलंय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या