पोलिसांनी पकडला सुमारे एक कोटींचा गुटखा ; असा लागला सुगावा…


अहमदनगर
   :  त्या गोडाऊनवर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला असता तीन ट्रक गुटखा पोलिसांनी पकडला. बोल्हेगाव परिसरात बुधवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत गुटख्याची मोजदाद सुरू होती. येवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा पकडल्याने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान गोवा, माणिकचंद, हिरा, सितार अशा विविध कंपनीचा हा गुटखा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन तरूण दुचाकीवर गुटखा विक्री करण्यासाठी नगर-पुणे रोडवरून जात असल्याची खबर कोतवाली पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कायनेटीक चौकात सापळा लावला. तेथे पाठलाग करून दोन तरूणांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे पिशवीमध्ये गोवा गुटखा मिळून आला. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता बोल्हेगावातील गुटखा गोडाऊनची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी या गोडाऊनवर छापा टाकला. तेथे विविध कंपन्यांचा गुटखा साठा पोलिसांना मिळून आला. सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ट्रकमध्ये भरण्यात आला. तीन ट्रक भरून हा गुटखा होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या