३ लाखांचा गुटखा जप्त : एकास अटक


बारामती :
  बारामतीत गुटखा विक्री प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे.गणेश दत्तात्रय मदने (वय:२५ वर्ष) (रा: मळद तालुका बारामती) असे ताब्यात घेण्यात आलेल्या नाव आहे. या प्रकरणी त्याच्याकडून एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुणवडी रोड सार्थक कलेक्शन शेजारी श्री दत्त ऑटोलाइन्स या दुकानासमोर गुटखा तंबाखू ने भरलेली क्वालिस गाडी उभी आहे अशी गुप्त बातमी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली. त्यानंतर त्यांनी लगेचच शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथक व उपविभागीय कार्यालयातील पथकाला सोबत घेऊन त्या ठिकाणी छापा मारला. यामध्ये गणेश दत्तात्रय मदने  राहणार मळद तालुका बारामती हा त्या ठिकाणी विविध ब्रॅण्डचा गुटका विक्रीसाठी घेऊन आलेला होता.  दोन पंचांसमक्ष त्याच्यावर छापा मारून त्या ठिकाणी त्याची क्वालिस गाडी क्र : (MH10AS1999 ) व विविध ब्रँड चा (विमल गोवा सौदागर V 1) गुटख्याची बोरी मिळून आली.  त्याच्या ताब्यातून गाडी मधून ३ लाख १९ हजार रुपयांचा निव्वळ गुटका ,पाच लाख रुपये किंमतीची क्वालिस गाडी, दहा हजार रुपयांचा मोबाईल व २६ हजार रुपये गुटखा विक्रीतून आलेले पैसे असा एकूण ८ लाख ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला अटक करून दोन दिवसाचा पोलिस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे. या गुन्ह्याला भादवि कलम ३२८ व अन्न सुरक्षा अधिनियम या प्रमाणे कारवाई केली आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर ढाकणे, सुनील मोटे, पोलीस कर्मचारी दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, खांडेकर, कोठे, अभिजीत कांबळे, दशरथ इंगवले व उपविभागीय कार्यालयाकडील कर्मचारी दराडे, साळवे, भोई यांनी केलेली आहे.

*फोटो ओळी :-
गुटखा विक्री प्रकरणी आरोपीला ताब्यात घेताना उपविभागीय कार्यालय व बारामती शहर गुन्हे शोध पथक. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या