जामीन मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नितेश राणेंना रुग्णालयातून डिस्चार्ज


न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे यांना बुधवारी कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला छातीत दुखू लागल्याने रुग्णवाहिकेतून नितेश राणेंना कोल्हापूरला नेण्यात आलं होतं शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे यांना बुधवारी कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला. नितेश राणे आणि त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी प्रत्येकी ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला. दरम्यान दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यात येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. सरकार पक्षातर्फे अँड प्रदीप घरत तर आमदार नितेश राणे, राकेश परब यांच्यासाठी अँड सतीश मानेशिंदे, अँड संग्राम देसाई, अँड राजेंद्र रावराणे आदींनी युक्तिवाद केला. नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची तब्येत बरी नसल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर छातीत दुखत असल्याने त्यांना कोल्हापूर येथील प्रमिलाराजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अधिक उपचारासाठी नेण्यात आलं होतं. दरम्यान जामीन मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नितेश राणे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नितेश राणेंना जामीन मंजूर होताच निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “जेव्हा बाहेर काढायचं…”संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर नितेश राणेंवर उपचार सुरु असताना दुसरीकडे त्यांच्या नियमित जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी निर्णय दिला. याबाबत माहिती देताना अँड संग्राम देसाई यांनी सांगितलं की, राणे व त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांना ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत त्या दोघांना कणकवली तालुक्यात प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच दर सोमवारी सकाळी १० ते १२ वाजता ओरोस पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागेल. याशिवाय पोलीस तपासात सहकार्य करतानाच पोलीस तपासासाठी बोलावतील तेव्हा उपस्थित राहावे अशी अट जामीन मंजूर करताना न्यायालयाने घातली आहे. नितेश राणेंना कोल्हापूरला हलवलं; छातीत दुखू लागल्याने रुग्णवाहिकेतून रवाना आमदार नितेश राणे याचे वकील संग्राम देसाई म्हणाले, पोलीस जलदगतीने तपास करत आहेत. त्यामुळे लवकरच दोषारोपपत्र दाखल होईल अशी अपेक्षा आहे. तसंच संदेश उर्फ गोट्या सावंत यांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळून हजर राहावे लागेल मात्र अन्य दोन संशयित फरार आरोपींचा राणे यांच्याशी काही संबंध नाही. राणे यांचे बंधू माजी खासदार निलेश राणे न्यायालयात हजर होते. जामीन मंजूर झाला आहे आता आणखी काही बोलणार नाही असं यावेळी ते म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख कणकवली करंजे येथील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट रचला असल्याचा संशय आमदार नितेश राणे यांच्यावर व्यक्त करण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या