पठ्ठ्यानं तब्बल एकरभर विहीर खोदली, पाणीही काठोकाठ! दुष्काळावर मात करण्यासाठी बीडच्या शेतकऱ्याची अनोखी शक्कल


दुष्काळामुळे विहिरी आणि पाण्याचे स्त्रोत कोरडे पडून नये म्हणून आता बीडच्या शेतकऱ्याने चक्क एक एकरात महाकाय विहीर खोदली आहे पठ्ठ्यानं तब्बल एकरभर विहीर खोदली, पाणीही काठोकाठ! दुष्काळावर मात करण्यासाठी बीडच्या शेतकऱ्याची अनोखी शक्कल

बीड: बीड जिल्हा आणि दुष्काळ  हे कायमचं समीकरणच बनले होते आता मात्र गेल्यावर्षी पावसाचे आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दुष्काळामुळे विहीर आणि पाण्याचे स्त्रोत कोरडे पडून नये म्हणून आता बीडच्या शेतकऱ्याने चक्क एक एकरात महाकाय विहीर खोदली आहे. शेतामधीले काठोकाठ भरलेलं पाणी पाहून तुम्हाला ते कुठले तरी धरण आहे असे वाटेल. मात्र ते कुठले धरण नाही तर एका शेतकऱ्याच्या घामाचं फलित आहे.

एक नाही दोन नाही तर तब्बल एक एकरामध्ये ही महाकाय अशी विहीर खोदली आहे. या विहिरीकडे पाहताना तुमचे डोळे दिपवून जातील डोळ्याचे पारणे फेडणारे हे दृश्य असले तीर या विहिरीमागचा संघर्षही तेवढाच महत्त्वाचा आहे.

पाचवीला पूजलेला दुष्काळ

सतत पाचवीला पूजलेला दुष्काळ आणि त्यातून पदरी येणारी निराशा यामळे शेतकऱ्यांची शेतीवरची आशाच उडून गेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी रक्ताचं पाणी करून विहीर खोदली आहे त्या संघर्षशील शेतकऱ्याचे नाव आहे मारुती बजगुडे.

गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी शेतकरी मारुती बजगुडे यांची बारा एकर जमीन आहे. जमीन कोरडवाहू असल्याने शेतातील सगळीच पिकं ही पावसावर अवलंबून असतात.

मूठभर धान्यही शेतकऱ्याच्या पदरात नाही

पाऊस झालाच नाही तर वर्षभरात मूठभर ही धान्यही शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही. त्यामुळे शेतीचा आणि पाण्याची असणारी गरज ओळखून मारूती बजगुडे यांनी एक एकर परिसरात विहीर खोदण्याचे स्वप्न उराशी बाळगले, आणि विहीर खोदली.

विहीर बनविताना गती मिळाली

बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होते अन् याचाच फायदा या शेतकऱ्यांनी उचलला. ही विहीर खोदत असताना निघणारे साहित्य आयआरबीला विकून टाकले, त्यामुळे विहीर बनविताना गती मिळाली. त्यातून या शेतकऱ्याला आर्थिक लाभदेखील झाला. विहीर खोदताना शेतकऱ्याला गती मिळाल्यानेत विहिरीचं ध्येयही साध्य झालं असल्याचे बजगुडे सांगता.

महाकाय  विहिर

या महाकाय अशा विहिरीचा व्यास 212 फूट असून खोली 42 फूट इतकी आहे. ही विहीर बांधण्यासाठी तब्बल तीन वर्षे लागले असून आतापर्यंत दोन कोटी रुपयांच्या आसपास या विहिरीसाठी खर्च आला आहे.

पुढार्‍यांना चपराक

दुष्काळ हटवण्यासाठी आणि पाण्याच्या योजनेसाठी सरकारमधील मंत्री वारंवार अश्वासनांची खैरात करतात. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. परंतु बीडच्या या शेतकऱ्याने तीन वर्ष संघर्ष करून बांधलेली ही महाकाय विहीर इथल्या पुढार्‍यांना चपराक मारणारी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या