वेरुळ लेण्यांसमोरील महावीर कीर्तिस्तंभ हटविण्याची सूचना


जैन समाजाकडून होणाऱ्या विरोधानंतरही पुरातत्त्व विभागाचे अधिकारी निर्णयावर ठाम जैन धर्मीयांनी भगवान महावीर यांच्या २५०० व्या निर्वाण पर्वानिमित्त स्तंभ उभारण्याचे निर्णय घेतले होते. जैन समाजाकडून होणाऱ्या विरोधानंतरही पुरातत्त्व विभागाचे अधिकारी निर्णयावर ठाम ‘गहराइयां’मधील अनन्या पांडेचे इंटिमेट सीन्स पाहून वडील चंकी म्हणाले…

औरंगाबाद :  जागतिक पर्यटनस्थळ असणाऱ्या वेरुळ लेण्यांसमोरच्या भागात ४८ वर्षांपूर्वी उभारण्यात महावीर कीर्तिस्तंभामुळे पर्यटकांची वेगवेगळय़ा प्रकारे अडचण होत असल्याने तो स्तंभ अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी विनंती सूचना भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधीक्षकांनी जैन धर्मीयांच्या प्रमुखांना केली आहे.


हा निर्णय जैन समाजाच्या भावना दुखावणारा असल्याने ती विनंती धुडकावून लावत स्तंभ तिथेच राहावा, अशी विनंती करण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शिष्टमंडळाने पुरातत्त्व सर्वेक्षण अधीक्षकांची भेट घेतली. जागतिक वारसा असणाऱ्या वेरुळ लेणीमध्ये तीन धर्माच्या लेणी आहेत. मग लेणीसमोर एकच स्तंभ कशासाठी असा प्रश्न निर्माण होत असून या स्तंभाभोवती विक्रेते जमतात. त्यामुळे परिसरातील माकडे गोळा होतात तेही पर्यटकांना त्रास देत असल्याने हा स्तंभ हटवाच, अशी विनंती पुन्हा एकदा अधीक्षक मीलनकुमार चावले यांनी केली.


  जैन धर्मीयांनी भगवान महावीर यांच्या २५०० व्या निर्वाण पर्वानिमित्त स्तंभ उभारण्याचे निर्णय घेतले होते. त्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त बी. के चौघुले यांची परवानगी घेतली होती. देशभरात १०० ठिकाणी असे स्तंभ तेव्हा उभारण्यात आले. त्यामुळे अचानक हा स्तंभ काढण्याबाबत आलेल्या सूचनेला वेरुळ येथील पाश्र्वनाथ ब्रह्मचर्याश्रम गुरुकुल यांनी विरोध केला असून आहे त्या ठिकाणीच हा स्तंभ ठेवावा, अशी मागणी असल्याचे अधीक्षक चावले यांनी सांगितले. वेरुळ लेण्यांसमोरील या स्तंभाभोवती आता खारे शेंगादाणे, मक्याचे कणीस यासह विविध वस्तू विक्रेत्यांचा गराडा असतो. खाण्याच्या पदार्थामुळे तेथे माकडे येतात. ती पर्यटकांना त्रास देतात. हा स्तंभ वेरुळ लेण्यांसमोरील रस्त्यावर असल्याने गाडी वळविण्यासही अडचणी होतात. त्यामुळे तो इतरत्र हलवावा अशी विनंती करणारे पत्र देण्यात आले होते. ती कायदेशीर नोटीस नव्हती. पण येत्या काळात हे स्तंभ हलविणे गरजेचे आहे, असे ठाम मत चावले यांनी मंगळवारी चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली भेटण्यास आलेल्या शिष्टमंडळालाही सुनावले. जागा भारतीय पुरातत्त्व विभागाची असून स्तंभ हटविला तर त्याचा पर्यटक सुविधांसाठी  फायदा होईल असा दावाही त्यांनी केला. कायद्यान्वये केलेली विनंती योग्य असल्याचे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, काही तरी पर्याय काढता येईल काय यावरही चर्चा करण्यात आली. मात्र, कायदेशीर मुद्दय़ांमुळे तोडगा काढण्यासाठी विभागीय आयुक्तांसमवेत चर्चा करू व बैठक घेऊन विषय मार्गी लावू, असे  खैरे यांनी सांगितले. स्तंभ त्याच ठिकाणी कायम ठेवावा अशी मागणी पुढे रेटली, तर वेरुळ लेण्यांच्या डोंगराजवळ असणाऱ्या पाश्र्वनाथाचे मंदिराचा मुद्दाही न्यायालयात नेऊ असेही पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितल्याने शिष्टमंडळही काहीसे नरमले.


मराठवाडय़ातील विविध पर्यटनस्थळांवर असणाऱ्या अडचणींची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत दिली होती तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनाही कल्पना दिली आहे. वेरुळ लेणी समोरील जैनस्तंभामुळे होणारा वाहतुकीचा अडथळा, स्तंभाभोवती विविध वस्तूंचे विक्रेते यामुळे पर्यटकला त्रास होतोच. त्यामुळे हा स्तंभ इतरत्र हलवावा अशी विनंती केली आहे. दुसराही एक मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे तीन धर्मीयांच्या लेणी वेरुळमध्ये आहेत. त्यात हिंदूू व बौद्ध लेणीही आहेत. त्यामुळे जागतिक वारसा असणाऱ्या पर्यटनस्थळी एकच स्तंभ कशासाठी, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. अद्याप कोणतीही न्यायालयीन नोटीस दिलेली नाही. स्तंभ इतरत्र हलवावा एवढीच विनंती आहे.-  – मीलनकुमार चावले, अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या