“भ शब्दाचा अर्थ संजय राऊतांना कळतो का ?

 


माझ्या बायको आणि आईला….”; किरीट सोमय्या संतापले

१९ बंगल्यांचा घोटाळा उघडकीस आणल्यानं मला जोड्याने मारण्याची भाषा केली जाते, असंही सोमय्या म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. किरीट सोमय्यांनी संजय राऊतांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर संजय राऊतांनी किरीट सोमय्यांसाठी अपशब्द वापरले होते. त्यावरून संतापलेल्या किरीट सोमय्यांनी “मला एकदाच काय ते सर्व शिव्या देऊन टाका, रोज रोज मला, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या आईला शिव्या देऊ नका,” असं उत्तर दिलं होतं. दरम्यान, आज किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

संजय राऊतांना त्यांनी दिलेल्या  या शिवीचा अर्थ कळतो का?, असा सवाल करत अर्थ कळत नसेल तर माझ्या बायको आणि आईला जाऊन विचारा, असं म्हणाले. संतापलेले किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, “माझी बायको आणि माझ्या सूनबाई दोघीही मराठी आहेत. अशा प्रकारची शिवी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेतर्फे संजय राऊत देतात. कारण मी त्यांची चोरी लबाडी लोकांसमोर आणली. त्यांचे घोटाळे लोकांसमोर आणले म्हणून मला शिवीगाळ करत आहेत,” असा आरोप सोमय्यांनी केला.

“…आणि राज्य-देश गेला खड्ड्यात”, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

“१९ बंगल्यांचा घोटाळा उघडकीस आणल्यानं मला जोड्याने मारण्याची भाषा केली जाते. परंतु स्वतः मुख्यमंत्री १२ कोटी जनतेची फसवणूक करत आहे, त्याचं काय, असा सवाल सोमय्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणावर एकही वाक्य बोलण्याची हिंमत मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या एकही नेत्यामध्ये नाही,” अशी टीका सोमय्या यांनी केली. यावेळी मातोश्रीवरून फोन आल्यानंतर कोर्लईचा सरपंच जबाब बदलत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या