प्रो कबड्डी लीगचा अंतिम सामना २५ फेब्रुवारीला


प्रो कबड्डीच्या जेतेपदासाठी सहा संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. यापैकी २१ फेब्रुवारीला दोन एलिमिनेटरचे सामने होतील. प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाचा अंतिम सामना २५ फेब्रुवारीला होणार असून, त्याआधी २१ आणि २३ फेब्रुवारीला ‘प्ले-ऑफ’ म्हणजेच बाद फेरीचे दोन टप्पे पार पडणार आहेत, असे संयोजक मशाल स्पोर्ट्सकडून बुधवारी जाहीर करण्यात आले. प्रो कबड्डीच्या जेतेपदासाठी सहा संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. यापैकी २१ फेब्रुवारीला दोन एलिमिनेटरचे सामने होतील. या सामन्यांत विजयी होणारे दोन संघ २३ फेब्रुवारीला उपांत्य फेरीत साखळीतील अव्वल दोन संघांशी झुंजतील, अशी माहिती प्रो कबड्डी लीगचे समन्वयक अनुपम गोस्वामी यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या