स्प्रे मारून एटीएम फोडण्याचा प्रयत्न ; पण चोरांची टाय टाय फिश


बीड :
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांचा मोठा धुमाकूळ पाहायला मिळतोय. मंगळवार 22 फेब्रुवारी 2022 रोजी पहाटे ४:०० वाजण्याच्या दरम्यान कानडी रोड वरील महाराष्ट्र बँकेचे एटीएमचे शटर उचकटून फोडण्याचा दोन चोरट्यांनी प्रयत्न केला.मात्र एटीएममध्ये रोकड नसल्यानं हा अनर्थ टळला,एटीएम समोराल मध्ये हे चोरटे कैद झालेत. या चोरट्यांनी वर काळा स्प्रे मारून कॅमेरा बंद केला.त्यानंतर गॅस कटरच्या मदतीने मशीन फोडली पण मशीनमध्ये रोकड नल्यानं या चोरांची टाय टाय फिश झाली.बीडमधील दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोऱ्यांचे प्रकार पाहता नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या