या प्रकरणामध्ये पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस चौकात आले तेव्हा सर्वांची धावपळ झाली
लेमन उर्फ संजय काळे, अमित बेडवाल, पवनसाठे असे अटक केलेले आरोपींचे नावे आहे. २० फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील क्रांती चौकात लाऊड स्पीकरवर गाणे लावून तलवारी घेऊन हे तरुण नाचत होते. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर लाइव्ह वेबकास्टच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओ मधील युवकांचे पडताळणी करून बुलढाणा शहर पोलिसांनी कारवाई केली.
बुलढाणा पोलीस स्थानकामधील उपनिरीक्षक दिलीप पवार, एएसआय माधव पेटकर, पोलीस हेड कॉनस्टेबल सुनिल जाधव, पो कॉन्सटेबल उमेश घुबे, चालक पोलीस हेड कॉनस्टेबल रमेश वाघ यांनी क्रांती चौकात धाव घेतली. पोलिसांना पाहून नाचणाऱ्यांनी पळापळ सुरु केली. यात लखन साठे, पवन साठे, सुनील काळे यांच्या हातात तलवारी दिसून आल्या.
या प्रकरणी एएसआय माधव पेटकर यांच्या तक्रारीवरुन लखन साठे, पवन साठे, सुनील उर्फ लेखन काळे, अमित बेंडवाल, निशांत श्रीवास्तव व इतर ८ ते १० जणांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय काळे, अमित बेडवाल, पवन साठे या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश लोधी हे करीत आहेत.
0 टिप्पण्या