Breaking News

पती-पत्नीचा मृत्यू ! गावात पसरली शोककळा…


अहमदनगर :
वीज पुरवठा खंडित झाल्याने शेततळ्यावर जनावरांसाठी पाणी आणण्यास गेलेले नीलेश रावसाहेब शिंदे (वय २६) व पत्नी पूजा नीलेश शिंदे (२३, अांचलगाव) यांचा पाय घसरून शेततळ्यात पडल्याने मृत्यू झाला. ही घटना आंचलगाव शिवारात घडली आहे. शेततळ्यावर वीजपुरवठा खंडीत झाल्याने जनावरांसाठी पाणी आणण्यास गेले असता त्यांचा तोल जावून प्लास्टीक कागदावरून घसरून ते थेट शेततळयात पडले. जवळ असलेली पत्नी पूजा हिने त्यांना हात देऊन वर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याही घसरून पाण्यात पडल्या. पोहता येत नसल्याने दाेघाांचा बुडून मृत्यू झाला. मृत नीलेश हे उच्चशिक्षित होते. वर्षभरापूर्वी पूजा बरोबर त्यांचे लग्न झाले होते. मात्र, नियतीच्या मनात वेगळेच असल्याने त्या दोघांचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याने आंचलगाव परिसरात शोककळा पसरली. याबाबत नितीन अंबादास शिंदे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली असता पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

Post a Comment

0 Comments