वाळू माफियांचा तहसिलदारांच्या घराला गराडा, दृश्ये सीसीटीव्हीत कैद


बीड :
बीडमध्ये तहसिलदार आणि वाळू माफिया वाद टोकाला पोहचला असून तहसिलदारांनी कारवाई केली म्हणून वाळू माफियांनी थेट तहसिलदारांचे घर गाठले. येथे अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत तहसिलदारांच्या घराच्या गेटवर लाथा मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार तहसिलदारांच्या घराबाहेरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. वाळू माफियांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे खाडे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय चांगलेच दहशतीत आहेत. 

बीडमधील गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांनी वाळू माफियांविरोधात कंबर कसली आहे. अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर खाडे यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने वाळू माफिया आणि तहसिलदारांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. याच वादातून आजचा प्रकार घडला आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी वाळू माफियांनी खाडे यांच्याविरोधात विविध तीन तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार सचिन खाडे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या