Breaking News

बाजार समितीच्या जमीन चौकशीला महसूलमंत्र्यांकडून स्थगिती


औरंगाबाद :
बाजार समितीच्या जिन्सी येथील जमीन व्यवहाराबाबत सहकार व पणन विभागाकडून चौकशी सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या चौकशी आदेशाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्थगिती दिली आहे. दरम्यान महसूल विभागाच्या कामकाजात राज्यमंत्र्यांचे अधिकारही सत्तार यांनी ओलांडले असल्याचेही सांगण्यात येत आहे. बाजार समितीमध्ये जमीन व्यवहाराच्या निमित्ताने कुरघोडी करण्याचे सत्तार यांच्या प्रयत्नांना चाप बसला असल्याचे मानले जात आहे. मोठी बातमी! अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; कारसहीत बंगल्यात शिरताना पकडल्यावर म्हटला, “माझ्या शरीरात चीप…” महसूल जमीन प्रकरणातील न्यायिक हक्क मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सचिवांमार्फत महसूलमंत्र्यांकडे चौकशीला स्थगिती मिळावी असा अर्ज केला होता. जिन्सी येथे बाजार समितीची ४५०२.३४ चौरस मीटर जमिनीची निविदा प्रक्रिया करून व सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करत शौर्य असोसिएट्स यांना २१कोटी ७५ लाख रुपयांना विक्री केली आहे. पूर्वी संचालक मंडळाने घेतलेला जमीन विक्रीचा निर्णय प्रशासकांनी अंमलबजावणीत आणला. या प्रकरणात सहकार व पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. या प्रकरणी सहकार व पणन विभागात सुनावणी सुरू असताना अचानकपणे महसूल विभागानेही जमीन व्यवहाराची नव्याने चौकशी करण्याचे आदेश राज्यमंत्री सत्तार यांनी बजावले होते. या प्रकरणी बाजार समितीने चौकशी आदेशाला स्थगिती देण्याची विनंती महसूलमंत्र्याच्या न्यायसनाला केल्या होत्या. त्यांनी बाजार समितीच्या बाजूने निकाल देत चौकशी आदेशाला स्थगिती दिली आहे. या प्रकरणातील जमीन व्यवहाराची इत्थंभूत माहिती महसूल मंत्र्याकडे सादर करण्यात आली आहे. न्याय व कायदेशीर प्रकरणात नाहक संशय निर्माण करण्याचा प्रयत्न नव्या चौकशीमुळे झाला असता त्यामुळे बाजार समितीने दाद मागितली होती.

Post a Comment

0 Comments