ह्यूज एडमीड्स कोसळले आणि अर्ध्या सेकंदात चारू शर्मा तयार झाले


फोनवर बृजेश पटेल यांनी चारू शर्मांना फोन करून ऑक्शनर ह्यूज एडमीड्स अचानक बेशुद्ध झाले असल्याचं सांगितलं.

बंगळूरू : शनिवार 12 फेब्रुवारी चारू शर्मा यांच्यासाठी एक सामान्य दिवस होता. ते दुपारच्या जेवणाचा मस्त आनंद घेत होते मात्र अवघ्या काही तासांतच त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. इंडियन प्रीमियर लीगचे अध्यक्ष बृजेश पटेल यांनी त्यांना फोन करून बंगळूरूच्या आईटीसी गार्डेनिया हॉटेमध्ये पोहोचण्यास सांगितलं. ज्या ठिकाणी आयपीएलच्या 2022चं ऑक्शन सुरु होतं.

फोनवर बृजेश पटेल यांनी चारू शर्मांना फोन करून ऑक्शनर ह्यूज एडमीड्स अचानक बेशुद्ध झाले असल्याचं सांगितलं. ज्यामुळे लिलाव काही काळ थांबवण्यात आलं असल्याचंही सांगितलं. चारू शर्मा हॉटेलवर पोहोचल्यावर आयपीएलच्या अधिकाऱ्यांनी ऑक्शनर ह्यूज एडमीड्स याचं काम करण्याची विनंती केली. यावेळी चारू शर्मा यांनी अवघ्या अर्ध्या सेकंदात होकार दिला.

बंगळूरूच्या ज्या हॉटेलमध्ये ऑक्शन सुरु होतं त्यापासून केवळ 15 मिनिटांच्या अंतरावर चारू शर्मा यांचं घर होतं. तातडीने चारू शर्मा हॉटेलवर पोहोचल्यावर अधिकाऱ्यांनी त्यांना संपूर्ण गोष्ट समजावून सांगितली. अधिकाऱ्यांनी चारू शर्मा यांना त्याचा वेळ घेण्यास सांगून तोवर ब्रेक घेण्याची घेणार असल्याचं सांगितलं.

मात्र चारू शर्मा देखील प्रोफेशनल ऑक्शनर असल्याने त्यांनी ब्रेकची गरज नसल्याचं सांगितली. आणि ऑक्शनरची कमान सांभाळण्यासाठी तयार झाले. 

दरम्यान चारू शर्मा यांनी एका वेबसाईला माहिती देताना म्हणाले, "मला माहिती होतं की बंगळूरूमध्ये लिलाव सुरु आहे. मात्र मी तो टीव्हीवर पाहत नव्हतो. ब्रिजेशचा कॉल होता आणि मला तातडीने उत्तर द्यायचे होते. लिलाव हा एक महत्त्वाचा भाग असल्याने म्हणून मी लगेच धावलो."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या