युक्रेनची राजधानी ताब्यात घ्यायला निघालेल्या रशियाला मोठा झटका


 किव्हः
युक्रेनची राजधानी किव्हच्या दिशेने चाल करुन येणाऱ्या रशियाच्या सैन्याला मोठा झटका बसला आहे. युक्रेनच्या हवाई दलाने रशियाच्या फायटर जेटवर हल्ला केला आहे. युक्रेनच्या गृह मंत्रालयाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

युक्रेनची राजधानी ताब्यात घ्यायला निघालेल्या रशियाला मोठा झटका

रशियाने युक्रेनवर हल्ला चढवल्यानंतर युक्रेनकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. रशियाने आता युक्रेनची राजधानी किव्हला लक्ष्य केलं आहे. आज सकाळीच रशियाने राजधानी किव्हवर सहा बॉम्ब हल्ले केले. हे हल्ले क्रूज आणि बॅलेस्टिक मिसायलने केले असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तर, रशियाने केलेल्या या हल्ल्यावर युक्रेनच्या सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. युक्रेनने रशियाचे एक लढाऊ विमान पाडलं आहे.

 रशिया-युक्रेन तणावात तेल ओतणाऱ्या अमेरिकेला झटका, 'व्हाईट हाऊस'बाहेर आंदोलक गोळा

युक्रेनने रशियाचे लढाऊ विमान पाडल्यानंतर विमानाचा मलबा पूर्ण किव्ह शहरावर पसरला होता. याआधीही युक्रेनच्या सैन्याने ३० टँक उद्ध्वस्थ केले आहेत. त्याचबरोबर युक्रेनने सात विमाने आणि ६ रशियन हेलिकॉप्टरसुद्धा पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

शुक्रवारी पहाटे किव्हमध्ये दोन मोठे स्फोट झाल्याचा दावा वृत्तसंस्थांने केले आहेत. तर, राजधानीपासून काही अंतरावर मोठा स्फोट झाला आहे. रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टीवर ताबा मिळवला आहे. या अणुभट्टीतील कर्मचाऱ्यांना ओलिस ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, रशियाने हल्ला केल्यानंतर काही तासांतट युक्रेनची हवाई संरक्षण यंत्रणा नेस्तनाबूत केल्याची जाहीर केले. युक्रेनमधील शहरांना आम्ही लक्ष्य करीत नसून, अचूक शस्त्रास्त्रांचा वापर करून हल्ले करीत असल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले होते. मात्र युद्धाच्या पहिल्याच दिवशी १३७ जणांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. तर, ३१६ नागरिक जखमी आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या