‘भाजपाचे साडेतीन लोक’नंतर संजय राऊतांच्या शेरोशायरीची चर्चा; ट्वीट करत म्हणाले,”…औकात में रहे!”


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आव्हान देत शड्डू ठोकला आहे. पुढच्या काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा इशाराही त्यांनी काल दिला आहे. त्यानंतर आज शिवसेना भवनात संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेत राऊत कोणते नवे खुलासे करणार? भाजपाचे साडेतीन लोक कोण? त्यांच्याबद्दल संजय राऊत काय बोलणार? या सगळ्याकडे आता लक्ष लागून राहिलं आहे. या सगळ्या दरम्यान आता संजय राऊत यांच्या एका ट्वीटची चर्चा होत आहे. राऊत यांनी राहत इंदौरी यांचा एक शेर ट्वीट केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये राऊत म्हणतात, “शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम, आँधी से कोई कह दे कि औक़ात में रहे – राहत इंदौरी”. आता त्यांचा हा शेर कोणाला उद्देशून आहे, याला उलगडा कदाचित संध्याकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेतच होईल. त्यामुळे आता ही पत्रकार परिषद महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काय उखडायचं ते उखडा, बघू कोणात किती दम आहे, असं म्हणत भाजपाला खुलं आव्हान दिलंय. तसेच पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपाला काल दिला.

उद्या (१५ फेब्रुवारी) शिवसेना भवनात सायंकाळी ४ वाजता शिवसेनेची पत्रकार परिषद होईल. तेव्हा मी तर असेनच, पण शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार महाराष्ट्रातून येतील. पक्ष म्हणून आम्ही येऊ. केंद्रीय तपास यंत्रणांची शिवसेना, ठाकरे परिवारावर जी काही दादागिरी सुरू आहे, खोट्या आरोपांचा चिखल उडवला जातोय त्या सर्वांना उत्तरं मिळतील, असं संजय राऊत काल म्हणाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या