प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करा


'पिंपरी-चिंचवड :
'पिंपरी-चिंचवडमध्ये पिण्याच्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोताची उपलब्धता कमी होत असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी करावा म. टा. प्रतिनिधी, पिंपरी गेल्यावेळी 'करुन दाखवलं', यंदाच्यामहानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचं नवं घोषवाक्य ठरलं 'पिंपरी-चिंचवडमध्ये पिण्याच्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोताची उपलब्धता कमी होत असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी करावा,' असे आवाहन महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

पाटील म्हणाले, 'पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त बांधकाम, बागकाम, रस्तेसफाई, औद्योगिक क्षेत्र, अग्रिशमन आदी कामांसाठी पाण्याची मागणी वाढत आहे. एकीकडे पाण्याची मागणी वाढत असताना दुसरीकडे शहरीकरणामुळे सांडपाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. पालिकेमार्फत घरात; तसेच सार्वजनिक ठिकाणी निर्माण झालेले सांडपाणी संकलित करून त्यावर मैलाशुद्धिकरण केंद्रामध्ये प्रक्रिया केल्यानंतर नदीत सोडले जाते. प्रक्रिया केलेले सांडपाणी पुनर्वापर करण्याचा प्रशासनाचा संकल्प आहे.' पाटील म्हणाले, 'माझी वसुंधरा आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करून पंचतत्त्वांपैकी जलतत्त्वाचे संवर्धन करणे शक्य आहे. पाण्याचा पुनर्वापर केल्याने तयार होणारे सांडपाणीदेखील कमी होणार असून, त्यामुळे नदी प्रदूषणामध्ये घट होण्यास मदत होईल. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त इतर गरजांकरिता पुनर्वापर केल्यामुळे बचत होऊन तितक्याच क्षमतेचे पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी लागणारा खर्चदेखील कमी होणार आहे.' 'प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर आरएमसी प्लॅंट, बांधकाम, बागकाम, फ्लशिंग, रस्ते साफसफाई, गाड्या धुणे, अग्निशमन, औद्योगिकीकरण, शेती इत्यादी कामांकरिता करणे सहज शक्य आहे. त्यामुळे शहरातील पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होईल. घरगुती व खासगी इमारत बांधकाम, उद्याने, औद्योगिक कारखाने आणि अन्य कामासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करून भूगर्भातील पाण्याचे संवर्धन करण्यासाठी हातभार लावावा,' असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या