Breaking News

शॉक लागल्याने वायरमॅनचा मृत्यू


 दौंड : यवत येथील विजवितरण कंपनीत बाह्यश्रोत कामगार म्हणून कामगर लक्षीमन बाळासाहेब जरंडे (वय 55 रा, डाळिंब ता, दौंड) हे काम करीत असताना मृत्यू झाला. याबाबत फिर्याद यवत वीज वितरण शाखा अभियंता  काकडे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. 8 रोजी दुपारी 2 च्या दरम्यान  प्रकाश नरसिग भोसले वरिष्ठ तंत्रद यांचा फोन आला की,  कासुर्डी टोलनाक्या जवळ सुहास हॉटेल समोर पवार यांचे डीपीवर काम करीत असताना कामगार जरंडे हे काम करीत असताना विजेचा शॉक लागून खाली पडले त्यांना त्वरित यवत येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले, तेथें डॉक्टरांनी सरकारी दवाखान्यात नेण्यास सांगितले, जरंडे उरुळीकाचंन येथील गजानन हॉस्पिटल येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासले असता जराडे हे मयत झाल्याचे सांगितले. याबाबतची फिर्याद यवत पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.


Post a Comment

0 Comments