रजिस्ट्री कार्यालय परिसरात दोघे जखमी
बीडः शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुद्रांक व नोंदणी कार्यालयाबाहेर आज सकाळी अकरा वाजता गोळीबार झाला. या परिसरातील दोन नागरिकांच्या दिशेने गोळी झाडण्यात आली. दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला. क्षणभर काय झालं ते कुणाला कळलंच नाही. नंतर जखमी झालेल्या दोघांना त्वरीत जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. घटनास्थळी काही काळ तणावाचं वातावरण होतं, पोलीस दाखल झाल्यानंतर ताण निवळला.
सतीश बबन क्षीरसागर आणि फारुक सिद्दीकी अशी या घटनेतील जखमींची नावं आहेत. 25 फेब्रुवारी रोजी हे दोघे सकाळी मुद्रांक व नोंदणी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांच्या दिशेने गोळीबार झाला. काही वेळातच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. जखमींना जिल्हा रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. प्राथमिक चौकशीनुसार, जमिनीच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याची माहिती हाती आली आहे.
0 टिप्पण्या