आता बिनधास्त वापरा इंटरनेट! Jio-Airtel-Vi चे सर्वात जास्त डेटासह येणारे स्वस्त प्लान्स, महिनाभर टेंशन फ्री


टेलिकॉम कंपन्या एअरटेल, वीआय आणि जिओकडे दररोज २ जीबी आणि ३ जीबी डेटा ऑफर करणारे शानदार प्लान्स आहेत. २८ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानची किंमत खूपच कमी आहे.

एअरटेल, वीआय आणि जिओकडे आहेत अनेक शानदार प्लान्स.

प्लानमध्ये डेटा, कॉलिंगसह मिळेल अनेक फायदे.

प्लानमध्ये दररोज मिळेल ३ जीबी डेटा. 'पीएम गती शक्ती' बदलणार पायाभूत क्षेत्राचा चेहरामोहरा

नवी दिल्ली: टेलिकॉम कंपन्या यूजर्सला आकर्षित करण्यासाठी डेटा, कॉलिंग, एसएमएससह वेगवेगळ्या बेनिफिट्ससोबत येणारे प्लान्स ऑफर करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपन्यांनी आपल्या प्लान्सच्या किंमती वाढवत ग्राहकांना मोठा झटका दिला होता. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वीआयकडे दररोज २ जीबी आणि ३ जीबी डेटासह येणारे काही स्वस्त प्लान्स आहेत. या प्लान्सविषयी जाणून घेऊया.

 स्मार्टफोन हरविल्यास टेन्शन न घेता फॉलो करा या ट्रिक्स, बंद फोन देखील करता येणार ट्रॅक

Reliance Jio चे २ जीबी आणि ३ जीबी डेटासह येणारे प्लान्स

जिओच्या २८ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लानची किंमत २९९ रुपये असून, यामध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

कंपनीकडे ४१९ रुपयांचा प्लान असून, यामध्ये २८ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा यानुसार एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते.

Vodafone idea चे २ जीबी आणि ३ जीबी डेटासह येणारे प्लान्स

वीआयच्या ३५९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळतो. याशिवाय प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा दिली जात आहे.

कंपनीच्या ४७५ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा यानुसार एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता २८ दिवस असून, यात अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय, दोन्ही प्लानमध्ये बिंज ऑल नाइट, वीआय हीरो अनलिमिटेड आणि वीआय मूव्हीस अँड टीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

एअरटेलकडे वीआयप्रमाणेच दररोज २ जीबी डेटासह येणारा ३५९ रुपयांचा प्लान आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएससह प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन, एअरटेल एक्सट्रीम पॅक, फ्री हॅलोट्यून्स आणि विंक म्यूझिकची सुविधा मिळते.

कंपनीच्या ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएससह प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन, एअरटेल एक्सट्रीम पॅक, फ्री हॅलोट्यून्स आणि विंक म्यूझिकची सुविधा मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या