ट्रकच्या टक्करने 3 तरुण गतप्राण, दोघे गंभीर


 नाशिक जिल्ह्यातल्या चाचडगावजवळ आयशर ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये झालेली धडक इतकी भयंकर होती की, यात पिकअप व्हॅनचा जागेवरच चुराडा झाला. या घटनेमुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघाताची माहिती समजताच चाचडगावच्या गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

नाशिकः नाशिक-पेठ महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये  तीन तरुण जागीच ठार झालेत. आयशर आणि पिकअप व्हॅनमध्ये हा अपघात झाला. यामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. कमलेश मोरे, संतोष लांडे, हेमंत मोरे अशी मृतांची नावे आहेत. हे तिन्ही तरुण चाचडगावचे आहेत. त्यामुळे गावावर शोककळा पसरलीय. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, पेठ येथून एक आयशर (एमएच 15, पीव्ही 8934) नाशिककडे जात होता. तर चाचडगावहून एक पिकअप व्हॅन (एमएच 15, एजी 937) पेठकडे जात होती. यावेळी दोन्ही वाहनांची भीषण टक्कर झाली. या अपघातात पिकअपमधील संतोष हिरामण लांडे (वय 25), कमलेश सुखदेव मोरे (वय 27) आणि हेमंत रघुनाथ मोरे (वय 26) या चाचडगाव येथील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातामध्ये लखन भगवान गांगोडे आणि रवींद्र वामन पोटींदे हे दोघे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रस्त्यावर रक्ताचा सडा

आयशर ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये झालेली धडक इतकी भयंकर होती की, यात पिकअप व्हॅनचा जागेवरच चुराडा झाला. या घटनेमुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघाताची माहिती समजताच चाचडगावच्या गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना माहिती समजली. ते ही तातडीने पोहचले. त्यांनी रस्त्यावरील मृतदेह, अपघातग्रस्त वाहने हटवली. या घटनेने चाचडगावसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या