कॉपी करु देण्यासाठी दहावीच्या परीक्षार्थीकडे 30 हजारांची लाच


  औरंगाबादेत संस्थाचालक अटकेत

औरंगाबाद : कॉपी करु देण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. लाच स्वीकारताना चक्क संस्थाचालकालाच अटक करण्यात आली आहे. औरंगाबादमधील पी डी जवळकर शाळेत कॉपी करु देण्यासाठी त्याने लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. एस पी जवळकर असं लाच स्वीकारणाऱ्या आरोपी संस्थाचालकाचं नाव आहे. 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना संस्थाचालकाला बेड्या ठोकण्यात आल्या. कॉपीच्या मोबदल्यात लाच स्वीकारताना संस्थाचालकालाच अटक झाल्यामुळे शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.


काय आहे प्रकरण?

बहि:स्थ विद्यार्थ्याला 30 हजार रुपयांची मागणी करणारा त्यापैकी 10 हजार रुपये घेणारा 64 वर्षीय शिक्षण संस्थाचालक संपत पाराजी वळकर (अध्यक्ष, कलावतीदेवी चॅरिटेबल ट्रस्ट) याला सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. शाळेतील महिला लिपिक सविता खामगावकर याही लाचखोरीत सहभागी असल्याचा आरोप आहे.


क्लार्क महिलेने लाच मागितल्याचा आरोप

एस. पी. जवळकर यांच्या औरंगाबाद शहरात शिक्षण संस्था आहेत. 24 वर्षीय तरुणाने दहावीच्या परीक्षेसाठी पी. डी. जवळकर शाळेतून 16 नंबर फॉर्म भरला हॉता. या परीक्षेचे हॉलतिकीट देण्यासाठी आणि परीक्षेत मदत करण्यासाठी या शाळेतील क्लार्क सविता खामगावकर यांनी त्याच्याकडे तीस हजार रुपयांची मागणी केल्याचा दावा केला जातो.


तडजोडीनंतर 15  हजार रुपये देण्याचे ठरले, मात्र विद्यार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. जवळकरच्याच ज्ञानप्रकाश विद्या मंदिर या गारखेडा परिसरातील शाळेत एसीबीने ट्रॅप लावला. यापैकी दहा हजारांचा पहिला हप्ता एस. पी. जवळकरांनी शाळेत घेतला. नंतर ते उल्का नगरीतील घरी गेले. मात्र एसीबीचे पथक त्यांच्या मागोमाग घरी गेले आणि जवळकर यांना ताब्यात घेण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या